किरीट सोमय्यांची बायको जीव द्यायला चालली होती;शिवसेना नेत्याचा सभागृहात दावा

Kirit Somaiya's wife was about to give her life; Shiv Sena leader claims in the House

 

 

 

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या वडिलांनी तिच्या मृत्यूचा नव्यानं तपास व्हावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात केली आहे.

 

शिवसेना उबाठाचे नेते, आमदार आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात हाच मुद्दा गाजला.

 

सत्ताधाऱ्यांनी शिवसेना उबाठाची कोंडी केली. यानंतर ठाकरेंचे विधान परिषदेतील आमदार अनिल परब यांनी खिंड लढवत सत्ताधाऱ्यांवर प्रतिहल्ला चढवला. यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नीच्या बाबतीत सनसनाटी दावा केला.

 

‘आदित्य ठाकरेंची केस कोर्टात गेल्या ५ वर्षांपासून सुरु आहे. यात सीबीआय, सीआयडी, एसआयटी चौकशी झाली. एसआयटी चौकशीचा अहवाल गेल्या दीड वर्षांत समोर का आणला नाही?

 

या प्रकरणात एसआयटीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून जुने विषय उकरुन काढताय का?

 

औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काल पूर्ण चेपून टाकली. आज दुसरा कोणता विषय नाही म्हणून आदित्य ठाकरेंचा विषय चर्चेत आणला. त्यांची चौकशी करायला आमची ना नाही,’ अशी भूमिका आमदार परब यांनी मांडली.

‘या सभागृहात मंत्री काय उत्तरं देतात? प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मग या प्रकरणाची सुनावणीही आता न्यायालयात सुरु आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यानं याचिका दाखल केलेली आहे.

 

आताही न्यायालयात त्याची सुनावणी सुरु आहे. १७ फेब्रुवारीला त्याची अंतिम सुनावणी होणार होती. त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते. म्हणून त्यांना पुढील तारीख दिली.

 

काल दिशाच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका त्या याचिकेला आमची याचिका टॅग करावी यासाठी आहे. कॉपी पेस्ट याचिका आहे. हे सगळं कोण करतंय हे न कळण्याइतके आम्ही मूर्ख आहोत का?’, असा सवाल परब यांनी विचारला.

‘आदित्य ठाकरेंचा दिशा सालियन प्रकरणाशी संबंध असेल, तर त्याची काळजी न्यायालय घेईल. एसआयटीचा अहवाल समोर आणला नाही,

 

त्या प्रकरणात कारवाई करा. संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस याच्याबाबतीत सत्ताधाऱ्यांनी तोंड उघडावं. त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही.

 

त्याचे इतके नागडे उघडे फोटो आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोणी बोलत नाही. काय चाललंय? जयकुमार गोरेचा राजीनामा घ्या. त्याच्या राजीनाम्याची मागणी करा.

 

जयकुमार गोरेचा राजीनामा मागत नाही. संजय राठोडचा राजीनामा मागत नाही. विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसंही दाबणार का?’, असा प्रश्न विचारत परब सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले.

 

सरकारच्या कारभाराचं अपयश लपवण्यासाठी हे सगळं सुरु आहे का? किरीट सोमय्यांची बायको आत्महत्या करायला चालली होती. इथे व्हिडीओ दिला, त्याची चौकशी होत नाही.

 

त्याची चौकशी का झाली नाही? किरीट सोमय्याचा दिला ना व्हिडीओ. का चौकशी केली नाही?, अशी प्रश्नांची सरबत्ती परबांनी केली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *