आजीदादाच्या मुलाच्या साखरपुड्यात चर्चा मात्र रोहित पवारांच्या सासऱ्याची
The talk of the town at the engagement of the grandfather's son is Rohit Pawar's father-in-law.

अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात संपन्न झाला. साखरपुड्याला अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय ज्यामध्ये शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य होते उपस्थित होते.
साखरपुडा जय पवारांचा झाला असली तरी चर्चा मात्र रोहित पवारांच्या सासऱ्यांची सुरु आहे. रोहित पवार हे मगरपट्टा शहराचे जावई आहेत. मगरपट्टा हे 123 कुटुंबांनी एकत्र येऊन विकसित केलेले महाराष्ट्रतील एकमेव शहर आहे.
महाराष्ट्र हे झपाट्याने विकसीत होत असलेले शहर आहे. सरकारतर्फे अनेक शहरांचा विकास केला जात आहे. तर, चौथ्या मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात नविन शहस विकसीत करण्याची योजना सरकारने आखली आहे.
पण, महाराष्ट्रात एक असं शहर आहे जे सरकारने नाही तर 123 कुटुंबांनी एकत्र येऊन विकसित केलं आहे. महाराष्ट्रतील सर्वात लोकप्रिय जिल्ह्यात हे शहर आहे.
15 ते 20 वर्षांपूर्वीच हे शहर निर्माण करण्यात आले. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत जिल्हा असलेल्या पुणे जिल्ह्यातील पुणे शहराजवळच हे छोटस शहर आहे. या शहराचे नाव आहे मगरपट्टा.
पुण्यातील सर्वात श्रीमंत एरियांच्या यादीत मगरपट्टा परिसराचे नाव सर्वात टॉपला आहे. सन 2000 पासून या शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. येथे 450 एकर जागा खाजगी मालकीची आहे.
मगरपट्टा सिटीला अनेक लोकं काही वर्षापूर्वी फॉरेन म्हणून ओळखत होते. तर सध्याच्या परिस्थिती हे खासगी विकसित शहर बनले आहे. मॉल,
आयटी पार्क, बाजारपेठा, शाळा, दवाखाने अशा सर्व सुविधा येथे आहेत. 2002 सालानंतर याचा झपाट्याने विकास झाला आणि येथे नव्या शहराचा उदय झाला.
मगरपट्टा या परिसरात मूळ ‘मगर’ आडनाव असलेल्या समुदायाच्या मालकीचे शेतांचे भूखंड होते. 1982 मध्ये मगरपट्टा परिसर क्षेत्र PMC द्वारे फ्युचर अर्बनिझेबल झोन म्हणून निश्चित केले गेले. यामुळे पुणे महापालिकेला विकासासाठी अगदी सहजपणे येथील जमीन ताब्यात घेता येत होत्या.
मात्र, मगपट्टा परिसरातील 123 मगर कुटुंबांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. विकासासाठी आपली जमीन पालिकेच्या ताब्यात द्यायटी नाही भूमिका त्यांनी एकमताने घेतली. 123 मगर कुटुंबांनी एकत्र येऊन स्वत:च्या बळावर जमीन विकसित केली.
123 मगर कुटुंबांनी मगपट्टा नावाचे शहर वसवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र एक कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून मगरपट्टा शहर विकसीत करण्यात आले.
प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या जमीनीनुसार त्यात वाटा मिळाला. मगरपट्टा शहर 430 एकर जागेवर वसले आहे. पुणे शहरातील सुसज्ज आणि विकसित शहर म्हणून मगरपट्टा सिटीची ओळख आहे.
सतीश मगर हे पुण्यातील मगरपट्टा सिटी या टाऊनशिपचे संस्थापक आहेत. रोहित पवार यांचे ते सासरे आहेत. सतीश मगर यांची कन्या कुंती यांचा विवाह कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याशी झालेला आहे. त्यामुळे सतीश मगर रोहित पवार यांचे सासरे आणि रोहित पवार हे मगरपट्टा सिटीचे जावई आहेत.