मंत्री स्पष्ट्च बोलले ,लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही

The minister spoke clearly, no one said that he would give Rs 2100 to his beloved sisters.

 

 

 

राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली.

 

या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असून निवडणुकांच्या जाहीरनाम्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वानस सरकारने दिलं होतं.

 

मात्र, अद्यापही महिलांना 1500 रुपयेच दिले जातात. तर, 2100 रुपये कधी द्यायचे ते आर्थिक बजेट पाहून निर्णय घेऊ असे अर्थमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी म्हटलं होतं.

 

तर, आता राज्याचे कॅबिनेटमंत्री नरहरी झिरवळ  यांनी 2100 रुपये देण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

 

‘लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही’, असे म्हणत झिरवळ यांनी चक्क 2100 रुपये देण्यावरुन घुमजाव केला आहे.

 

लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्यातील हफ्ता कधी जमा होणार, याची प्रतिक्षा सध्या लाडक्या बहिणींना आहे.

 

तसेच, 1500 रुपयांचे 2100 कधी होणार याची देखील उत्सुकता आहे. मात्र, लाडक्या बहिणींच्या हप्त्यावरुन सत्ताधाऱ्यांची टोलवाटोलवी सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

‘लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही’, असे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलंय. विरोधकांनीच 2100 रुपयांवर जोर लावलाय.

 

लाडक्या बहि‍णींना 1500 रुपयेही पुरेसे आहेत, त्या खूश आहेत, असे म्हणत झिरवळ यांनी 2100 रुपये देण्यावरुन पलटी मारल्याचं दिसून येत आहे.

 

लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामध्ये या योजनेचा वाटा महत्त्वाचा ठरला.

 

कारण, महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देऊ, असं आश्वासन देण्यात आलं होत.

 

मात्र, महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊन देखील लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये पुन्हा वाढ न करण्यात आल्यानं विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

 

त्यावर जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो, असं उत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. मात्र, आता तर 1500 रुपयांत लाडक्या बहिणी खुश आहेत, 2100 देऊ असं म्हटलंच नसल्याचे राज्य सरकारमधील मंत्री झिरवळ यांनी म्हटलं आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपायच्या अगोदर प्राप्त होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

 

पुणे येथे पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी याबाबत सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच पहिल्यापासून निधी दिला जातो,

 

असं आदिती तटकरे यांनी सांगितलं. नमो शेतकरी योजनेतून ज्या महिलांना एक हजार रुपये मिळतात, त्यांना 500 रुपये मिळतील हे योजनेचे दोन शासन निर्णय होते त्यामध्येच निश्चित करण्यात आलं होतं, असं देखील त्यांनी सांगितलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *