देशावर सायबर युद्धाचे सावट , महाराष्ट्र सायबर विभागाचा धक्कादायक अहवाल
Shadow of cyber war looms over the country, shocking report from Maharashtra Cyber Department

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारताला आणखी एका नवीन धोक्याचा सामना करावा लागत आहे.
हा धोका दुसरा तिसरा काही नसून म्हणजे सायबर युद्धाचा आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने ‘इकोज ऑफ पहलगाम’ नावाचा एक अहवाल तयार केला आहे.
या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 23 एप्रिलनंतर देशावर जवळपास १० लाख सायबर हल्ले झाले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात सायबर हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे महाराष्ट्र सायबरचे प्रमुख यशस्वी यादव यांनी सांगितले.
धक्कादाय म्हणजे हे हल्ले फक्त डिजिटल स्वरुपाचे नाही तर एका संघटित सायबर युद्धाचा भाग असल्याचे यादव यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाच्या या अहवालानुसार सायबर हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्व, मोरोक्को आणि इंडोनेशिया या देशांमधून केले जात आहेत.
हे सर्व हल्लेखोर स्वतःला इस्लामिक गट असल्याचे सांगणारे सायबर संघटन आहेत. यापैकी ‘टीम इन्सेन पीके’ हा गट सर्वाधिक सक्रिय आहे.
हा पाकिस्तानचा ‘अॅडव्हान्स्ड पर्सिस्टंट थ्रेट’ गट आहे. या गटाने आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, सैनिक कल्याण विभाग आणि अनेक आर्मी पब्लिक स्कूलच्या वेबसाइट्सना लक्ष्य केले आहे.
इतक नाही तर असुरक्षित PDF फाइल ओपन करताच त्यातून मोबाईल आणि संगणक हॅक केले जात आहेत. गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगार पीडीएफचा वापर करून गोष्टी हॅक करत आहेत.
या सायबर हल्ल्यांमध्ये वेबसाइट्स हॅक करणे (डिफेसमेंट), सीएमएसमधील त्रुटींचा वापर करणे (सीएमएस एक्सप्लॉइटेशन) आणि कमांड अँड कंट्रोल अटॅक यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त बांगलादेशमधील ‘मिस्टीरिअस टीम बांगलादेश’ आणि इंडोनेशियातील ‘इंडो हॅक्स सेक’ हे गट देखील सक्रिय आहेत. या गटांनी भारतीय टेलिकॉम डेटा आणि लोकल ॲडमिन पॅनेल्सना लक्ष्य केले आहे.
हे सर्व हल्ले 26 एप्रिलपासून सुरू झाले असून यापैकी अनेक हल्ले यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने काही हल्ले यशस्वीरित्या हाणून पाडले असले तरी अहवालात नमूद केल्यानुसार भारताच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा जसे की रेल्वे, बँकिंग आणि सरकारी पोर्टल्सना मोठा धोका निर्माण झाला आहे.
या अहवालातील आणखी एक गंभीर खुलासा म्हणजे अनेक ठिकाणी सायबर सुरक्षा व्यवस्था कमजोर असल्यामुळे हे हल्ले यशस्वी झाले आहेत. डार्क वेबवर भारतीय टेलिकॉम कंपन्यांचा टेराबाइट डेटा लीक झाला आहे.
यामुळे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यशस्वी यादव यांनी पुढे सांगितले की, आम्ही संबंधित तपास यंत्रणांना त्यांच्या सायबर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची, रेड टीम असेसमेंट, डीडीओएस फेलओवर टेस्ट आणि सिस्टीम ऑडिट्स अनिवार्य करण्याची विनंती केली आहे.