कोरोनाचा धोका वाढला; सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी;या राज्यात मास्क घालण्याच्या सूचना

Corona threat increased; Guidelines issued by the government; instructions to wear masks in this state

 

 

 

 

केरळमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांसाठी खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

 

 

केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 आढळून आला आहे. तिरुवनंतपुरतमधील एका ७९ वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाली आहे. येणारे काही दिवस सण-उत्सवांचे आहेत.

 

 

त्यामुळे विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काही खबरदारी घेण्याची गरज आहे, असं केंद्र सरकारच्या सूचनेमध्ये म्हणण्यात आलं आहे.

 

 

केंद्र सरकारच्या सूचनेमध्ये सांगण्यात आलंय की, जिल्हा पातळीवर रुग्णांचे सर्व्हेक्षण केलं जावं. यातील सर्दीसारखा आजार, श्वास घेण्यास अडचण अशा रुग्णांची ओळख करावी. सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक टेस्टिंग कीट असल्याची खात्री करण्यात यावी.

 

 

कोरोना JN.1 व्हेरियंट हा पिरोलाचा भाऊबंध असल्याचं सांगितलं जातं. याचा पहिला रुग्ण अमेरिकेमध्ये सप्टेंबर २०२३ मध्ये आढळून आला होता. त्यानंतर चीनमध्ये डिसेंबर महिन्यात या विषाणूची लागण झालेले ७ रुग्ण आढळून आले होते.

 

 

 

कोरोना JN.1 व्हेरियंट तसा सौम्य आहे. यामुळे काळजी करण्याची गरज नसल्याचं वैज्ञानिक सांगतात. सौम्य ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, सर्दी, अंगदूखी, डोकेदुखी

 

 

अशा प्रकारचे लक्षणं या विषाणूमुळे जाणवू शकतात. विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने त्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

 

केरळमध्ये पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर कर्नाटक सरकार देखील अलर्ट मोडमध्ये गेला आहे. राज्याने वयस्कर नागरिकांसाठी मास्क घालण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

 

 

 

तसेच केरळ-कर्नाटक सीमेवरुन प्रवासावर काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सूचना जारी झाल्यानंतर राज्य सरकारला आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

 

 

दरम्यान कर्नाटकातील कोडागु येथे पत्रकारांशी बोलताना आरोग्य मंत्र्यांनी घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आम्ही काल एक बैठक घेतली. जिथे आम्ही काय पावले उचलली पाहिजेत यावर चर्चा करण्यात आली.

 

 

आम्ही लवकरच एक अॅडव्हायजरी जारी करू असेही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ज्यांचे वय 60 वर्षांहून अधिक आहे आणि ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे आणि ज्यांना कॉमोरबिडीटी आहे, त्यांनी मास्क घालणे आवश्यक आहे.

 

 

तसेच आम्ही सरकारी रुग्णालयांना तयार राहण्यास सांगितले आहे. केरळच्या सीमेला लागून असलेल्या प्रदेशांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

 

 

 

मंगलोर, चमनाजनगर आणि कोडागु येथे सतर्कता बाळकण्याची आवश्यक आहे. चाचण्यांची संख्या देखील वाढवली जाईल. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांनी अनिवार्यपणे चाचण्या कराव्यात, असेही त्यांनी सांगितलं.

 

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सोमवारी 1,828 वर पोहोचली आहेत. तर केरळमध्ये एक मृत्यू नोंदवला गेला असून येथे कोरोनाचा सब व्हेरियंज JN.1 नुकताच आढळला होता,

 

 

 

सध्या कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.46 कोटी (4,44,69,931) झाली आहे. देशातील रिकव्हरी रेट 98.81 टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कोरोनामुळे आतापर्यंत 5,33,317 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *