Babajani Durrani ;बाबाजानी दुर्रानीना सत्तेशिवाय करमेना
# BabaJaniDurrani #Abdullah Khan #AjitPawar #SharadPawar #PathriAssembly #Rajeshvitekar #

पाथरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार Abdullah Khan alias Baba Jani Durraniअब्दुल्ला खान उर्फ बाबा जानी दुर्राणी यांना सत्तेचा मोह अवरेनासा झाला असून ,विरोधात राहून राजकारण करणे सोपे नाहीं जनु, याची चुणूक लागली कि काय ?म्हणून आता दुर्रानी हे शरद पवार यांची साथ सोडून खूप मुख्यमंत्री Ajit Pawarअजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत
8 जून रोजी पाथरी शहरात हा पक्षप्रवेशाचा सोहळा जवळपास निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे . बाबाजानी दुर्राणी यांनी गेल्या वर्षभरात चार पक्ष बदलले आहेत .
पाथरी तालुक्यात जवळपास पंचेवीस ते तीस वर्ष आखाती सत्ता गाजवलेल्या बाबाजानी दुर्राणीची राजकीय दिशा पलटली आणि गेल्या वर्षभरापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागल्यासारखे झाले आहे.
राजकीय पटलावर त्यांचे सतत चुकत असलेले निर्णय आणितयार झालेले प्रबळ विरोधक यामुळे दुर्राणीना आपले राजकीय अस्तित्व सअबाधित ठेवण्याकरिता सतत पक्ष बदलावे लागत आहे. गेल्या वर्षभरात दुर्रानी यांनी सतत पक्ष बदलले यामुळे त्यांचे उरलेसुरले समर्थकही बुचकड्यात पडले आहेत.
त्यांनी पक्ष बदलला की त्या पक्षाला सत्तेचा लाभ होत नसल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतर काकाची साथ सोडून पुतण्याच्या राष्ट्र्वादीत गेलेल्या बाबाजणींनी अजितदादांनी विधानपरिषदेला संधी न दिल्याने विधानसभेच्या तोंडावर Sharad Pawarशरद पवारांच्या राष्ट्र्वादीत प्रवेश केला,
उमेदवारीसाठी प्रयत्न केले मात्र महाविकास आघाडीत Pathri Assembly पाथरी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने त्यानी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली त्यात 48 हजाराच्या जवळपास मतदान घेतले त्यांचा पराभव झाला.
सत्तेत नसले कि आजूबाजूचा गोतावळा कसा सरकतो याची चुणूक आता बाबाजानी दुर्रानी यांना आलेली आहे. शरद पवार यांनी त्यांना अद्याप पक्षातून काढलेले नाही परंतु सत्तेशिवाय करमेना अशी त्यांची अवस्था झालेली आहे.
होऊ घातलेल्या नगर परिषद ,जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सत्तेसोबत राहिल्याशिवाय राजकीय अस्तित्व अबाधित ठेवणे शक्य नाही हे त्यांना कळले असेल त्यामुळे दुर्रानी यांनी अजितदादांचे नेत्रत्व साकारण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
महिन्याभरापूर्वी Rajeshwitekarराजेश विटेकर यांनी बाबाजानी दुरानी यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर पक्षप्रवेशाच्या चर्चेला चर्चा सुरू झाल्या होत्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळ दिल्यामुळे दुर्राणी यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला असून
आठ जून रोजी पाथरी येथे पक्षप्रवेश 16 होणार आहे या सोहळ्यात दुर्रानी यांच्यासह त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे
दुर्रानी यांच्या पक्षप्रवेशाने पाथरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत मिळत आहेत पक्षप्रवेशाने अजित पवार
यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळणार आहे आपापल्या पातळीवर पक्ष वाढीसाठी उपमुख्यमंत्री पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे हे प्रयत्न करत आहेत अजित पवार हे अडीच महिन्यात दुसऱ्यांदा परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत