उमेदवारी कापल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर काय म्हणाल्या भावना गवळी ?

What did Bhavna Gawli say about not getting the nomination?

 

 

 

मी नाराज नाही, मात्र तिकीट न मिळाल्यामुळे मला खंत वाटली, असं शिंदे गटाच्या नेत्या आणि खासदार भावना गवळी म्हणाल्या आहेत.

 

 

 

गेल्या पाच टर्मपासून खासदार असणाऱ्या भावना गवळी यांना यंदा शिंदे गटाने तिकीट दिलं नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. यातच आज त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

 

 

भावना गवळी म्हणल्या की, ”प्रचाराला निघाली नसल्याने, मी नाराज आहे, अशी चर्चा होत आहे. मात्र मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छी ते की, नाराज होणाऱ्यांपैकी मी नाही.

 

 

मात्र मला खंत वाटते की, मी इतके वर्ष काम केलं आहे. इतके वर्ष काम केल्यानंतर असं कसं काय होऊ शकतं. कारण बाकीच्या अनेक खासदारांना

 

 

 

ज्यात पाच, तीन, चार टर्मचे खासदार आहे, त्यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे मला खंत वाटली, म्हणून मी बाहेर पडली नाही.”

 

 

 

 

त्या म्हणाल्या आहेत की, आपल्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान व्हावेत, अशी माझी इच्छा आहे. यावेळी

 

 

 

 

पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या विकासकामांचा पाढाही वाचला, मात्र तिकीट न मिळाल्याने आपण नाराज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

 

 

भावना गवळी म्हणाल्या आहेत की, ”तिकीट न मिळाल्याने मला खंत होती की, आपण कुठे कमी पडलो, मात्र ठीक आहे. मी लढणारी असल्यामुळे निश्चितच आपल्या उमेदवारासाठीही लढणार आहे.”

 

 

 

त्या म्हणाल्या, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नारा आहे की, अब की बार 400 पार, यालाच साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की, मी याठिकाणी महायुतीच्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून समोर निघाली आहे.”

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *