रेल्वेचा विक्रम;भंगार विकून कमावले 248 कोटी

Railway's record; 248 crores earned by selling scrap ​

 

 

 

 

 

आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल, मात्र मध्य रेल्वेने एक वेगळा विक्रम केला आहे.

 

 

मध्य रेल्वेच्या सर्व विभागांनी मिळून फक्त भंगार विक्रीतून तब्बल 248 कोटी रुपये कमावले आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व विभागातील भंगार विक्रीतील ही सर्वाधिक वाढ आहे. मध्य रेल्वेने नोव्हेंबर 2023 पर्यंत तब्बल 18, 229 दशलक्ष टन भांगराची विक्री करून 248 कोटी कमावले आहेत.

 

 

रेल्वेने सध्या शून्य भंगार उपक्रमाला गती दिली आहे. त्या अंतर्गत रेल्वे स्थानक आणि परिसरातील रेल्वेचे भंगार साहित्य विक्रीसाठी काढले आहे.

 

 

या उपक्रमामध्ये भंगार विक्रीत 34.09 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वयोमर्यादा पूर्ण झालेले रेल्वे इंजीन, अतिरिक्त डिझेल इंजीन, वापरात नसलेले रेल्वेरूळ आणि वयोमर्यादा पूर्ण झालेली अपघातग्रस्त डब्यांसह इंजीन

 

 

यासह विविध प्रकारचे भंगाराचे वर्गीकरण करीत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वेने पाऊल उचलले आहे. त्यामुळेच भंगार विक्रीतून हे 300 कोटी रुपये मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

 

 

त्या उद्दिष्टाच्या 82 टक्के उद्दिष्ट नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण झालेले आहे. मध्य रेल्वेच्या सर्व विभागातील भंगार विक्रीतील ही सर्वाधिक वाढ आहे. मध्य रेल्वेने नोव्हेंबर 2023 पर्यंत तब्बल 18, 229 दशलक्ष टन भांगराची विक्री करून 248 कोटी कमावले आहेत.

 

 

कोणत्या विभागाने किती भंगार विकले?
भुसावळ : 7 हजार 994 दशलक्ष टन
मुंबई : 4 हजार 144 दशलक्ष टन

 

 

नागपूर : 3 हजार 748 दशलक्ष टन
सोलापूर : 1 हजार 280 दशलक्ष टन
पुणे : 1 हजार 63 दशलक्ष टन

 

 

रेल्वेने विक्री केलेल्या भंगारातून भुसावळ विभागाला 49 कोटी 20 लाख, माटुंगा आगाराला 40 कोटी 58 लाख, मुंबई विभागाला 36 लाख 39 हजार, भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेडला 23 कोटी 67 लाख, नागपूर विभागाला 22 कोटी 32 लाख,

 

 

पुणे विभागाला 22 कोटी 31 लाख, सोलापूर विभागाला 20 कोटी 70 लाख, परळ, हाजी बंदर-शिवडी, मनमाड व करी रोड यांनी एकत्रितपणे विक्री केलेल्या भंगारातून त्यांना 32 कोटी 90लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

 

 

मध्य रेल्वेने 2022 ते जून 2023 या कालावधीत 303.37 कोटी रुपयांचा विक्रमी तिकीट तपासणी महसूल जमा केला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा महसुलात 41.50 टक्क्यांची वाढ झाली

 

 

 

आहे. मध्य रेल्वेने 2022-23 या आर्थिक वर्षात 46.86 लाख प्रकरणांमधून 303.37 कोटी रुपये कमावले आहेत. रेल्वे बोर्डाने 235.50 कोटींचं उद्दीष्ट ठेवून 303.37 कोटी रुपयांची कमाई केल्याने महसुलात वाढ झाली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *