देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी वकीलाला चांगलेच फैलावर घेतले.

The Chief Justice of the country DY Chandradud took the lawyer well.

 

 

 

 

सुप्रीम कोर्टात आज दुर्मिळ असा प्रसंग पाहायला मिळाला. देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड एका वकिलावर चिडल्याचं पाहायला मिळालं.

 

 

एका याचिकेची लिस्टिंग करत असताना डी वाय चंद्रडूड यांनी वकीलाला चांगलेच फैलावर घेतले. तसेच तुम्ही कोर्टाला अशी धमकी देऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी फटकारले.

 

 

 

सरन्यायाधीशांनी वकीलाला योग्य दृष्टीकोन ठेवून आणि सन्मानपूर्वक आपली गोष्ट समोर ठेवण्यास सांगितलं. वकील वरच्या आवाजात सरन्यायाधीशांची बोलत होते.

 

 

 

त्यामुळे चंद्रचूड काहीशे निराश झाल्याचं दिसले. ते म्हणाले की, एक सेकंड, तुम्ही अगोदर हळू बोला. तुम्ही भारताच्या सर्वोच्च न्यायालययात बोलत आहात. तुमचा आवाज कमी ठेवा. अन्यथा मला तुम्हाला बाहेर काढावं लागेल.

 

 

 

वकील ज्याप्रकारे वर्तन करत होता ते सरन्यायाधीशांना आवडले नाही. ते म्हणाले की, तुम्ही सर्वसाधारणपणे कोणासमोर हजर होता. तुम्ही प्रत्येकवेळी अशाच प्रकारे कोर्टात मोठ्याने बोलता का? तुम्हाला कोर्टाची मर्यादा राखणे आवश्यक आहे.

 

 

 

अगोदर तुम्ही आवाज कमी करा. मोठ्याने बोलून तुम्ही आम्हाला घाबरवू शकता असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. असं २३ वर्षांत कधी झालं नाही आणि असं माझ्या करियरच्या शेवटच्या वर्षांत देखील होणार नाही.

 

 

 

सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळाले. गप्प, बिलकूल गप्प राहा. तुम्ही आताच कोर्ट सोडून जा. तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही.

 

 

मुख्य न्यायाधीशांच्या अशा रौद्र रुपामुळे वकिलाची घाबरगुंडी उडाली. त्यावेळी वकिलाने सरन्यायाधीशांना माफी मागितली. तसेत त्यानंतर वकिलाने विनम्रपणे आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडलं.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *