देशभरात झपाट्याने वाढतोय कोरोना; भाजप आमदारालाही लागण

Corona is increasing rapidly in the country; BJP MLA also infected

 

 

 

 

कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. देशभरात कोरोनाच्या जेएन.1 (JN1) या सब व्हेरियंयचे रुग्णाचे प्रमाण वाढत आहे.

 

 

गजियाबादमध्ये भाजप आमदार अमित त्यागी यांनाही जेएन.1 या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. आठ महिन्यानंतर गाजियाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.

 

 

कोरोनाच्या JN.1 या नव्या विषाणूचे रुग्ण जगभरात वेगाने वाढत आहेत. आतापर्यंत 40 देशात या नव्या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. भारतामध्ये जेएन .1 या विषाणूचे आतापर्यंत 23 रुग्ण आढळले आहेत.

 

 

त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण गोवा येथे आढळले आहेत. गोवामध्ये जेएन.1 विषाणूचे 19 रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. तर केरळ आणि महाराष्ट्रात जेएन.1 या कोरोना विषाणूचे प्रत्येकी एक एक रुग्ण आढळले आहेत.

 

 

देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. सध्या देशातील एकूण कोरोनबाधित रुग्णांची संख्या 2669 इतकी झाली आहे. आज देशात 358 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

 

 

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासात फक्त केरळमध्ये 300 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये तीन जणांचा मृत्यूही झलाय. केरळमध्ये मागील तीन वर्षांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 72 हजारापेक्ष जास्त झाली.

 

 

 

गजियाबादमध्ये भाजप आमदार अमित त्यागी यांनाही जेएन.1 या कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेंसिंगसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

 

 

आरोग्य विभागाच्या माहितीनुसर, अमित त्यागी यांना खोकला आणि सर्दी झाली होती. त्यामुळे त्यांनी कोरोनाची तपासणी केली.

 

 

त्यामध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अमित त्यागी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आयसोलेट झाले आहेत. त्यांच्या कुटुंबाचीही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

 

 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देशाच्या काही भागांमध्ये वाढत्या कोविड-19 प्रकरणांच्या पार्श्‍वभूमीवर कोविड-19 परिस्थिती आणि संनियंत्रण, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला.

 

 

 

केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर दर तीन महिन्यांनी एकदा मॉक ड्रिल करू आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करूयात. योग्य सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद नियोजनासाठी कोविड-19 प्रकरणे, लक्षणे आणि प्रकरणांची तीव्रता

 

 

याबाबत उद्गामी पुराव्यांवर राज्यांनी लक्ष द्यावे. नवीन व्हेरियंटचा माग घेणे सुकर व्हावे यासाठी सर्व कोविड-19 बाधित नमुने इन्साकॉग प्रयोगशाळांमध्ये पाठवण्याचा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सल्ला दिला.

 

 

आगामी सण उत्सवांचा काळ लक्षात घेता, राज्यांनी पुरेशा सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक व्यवस्था सज्ज ठेवाव्यात, तसेच श्वसनसंस्थेशी निगडीत स्वच्छता सूचनांचे पालन करावे जेणेकरून, या आजाराचे संक्रमण टाळता येऊ शकेल.

 

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सामायिक केल्याप्रमाणे कोविड-19 साठी देखरेख ठेवण्याच्या सुधारित धोरणाची तपशीलवार आणि प्रभावी अंमलबजावणी तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्याचे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे.

 

 

रुग्णसंख्येचा वाढता कल लवकर ओळखण्यासाठी, राज्यांना एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्म पोर्टलसह, फ्लू सारखे आजार किंवा गंभीर स्वरूपाच्या श्वसन रोगावर (एसएआरआय-सारी) लक्ष ठेवण्यास आणि त्याचा वेळोवेळी अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

 

कोविड-19 चाचणीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पुरेशा प्रमाणात चाचण्या सुनिश्चित करण्याचा आणि आरटी-पीसीआर आणि त्यातील शिफारस करण्यात आलेला अॅंटी जेन चाचण्यांचा वाटा कायम ठेवण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.

 

 

आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी तसेच जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या रक्ताचे नमुने, भारतीय सार्स सीओव्ही-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (आयएनएसएसीओजी) प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. जेणेकरून देशात नवीन स्वरूपाचा विषाणू आल्यास, त्याचा वेळेवर शोध घेता येईल.

 

 

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, सर्व सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सुविधांची तयारी आणि प्रतिसाद क्षमता यांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या रंगीत तालमीत त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे.

 

 

 

श्वसनविषयक सार्वजनिक नियमांचे पालन करण्यासह कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी सामुदायिक जागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांनी सातत्याने पाठिंबा द्यावा, असेही या पत्रात म्हटले आहे.

 

 

 

राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत मांडवीय यांनी बैठक घेतली. करोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारांनी कोव्हिड-१९च्या रुग्णांची वाढती संख्या, लक्षणे, आजाराची गंभीरता यावर लक्ष ठेवून,

 

 

सार्वजनिक आरोग्याच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे मांडवीय यांनी सांगितले. केरळ, महाराष्ट्र, झारखंड आणि कर्नाटक या राज्यांत दैनंदिन करोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ नोंदवली जात असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

 

 

चीन, ब्राझील, जर्मनी आणि अमेरिकेत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर सज्जता आणि सावधगिरी महत्त्वाची असल्याचे मांडवीय यांनी सांगितले.

 

 

‘जीनोम सिक्वेन्सिंग’ची देखरेख प्रणाली भक्कम करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी करोना चाचण्या वाढवाव्यात आणि विषाणूचे नव्या प्रकारांचा आढावा घेण्यासाठी पॉझिटिव्ह नमुने ‘इंडियन सार्स सीओव्ही-२ जिनोमिक्स कन्सोर्टियम’कडे पाठवावेत, असेही बैठकीत सांगण्यात आले.

 

 

 

देशात कोरोनाचे कमबॅक, यंत्रणा अलर्ट मोडवर, आरोग्य विभागाच्या हालचाली सुरू

देशात बुधवारी ६१४ नवीन करोनारुग्णांची नोंद

– २१ मे पासूनची ही एका दिवसातील उच्चांकी रुग्णसंख्या.

– देशात बुधवारअखेर सक्रिय करोनारुग्णांची संख्या २३११.

 

 

– सक्रिय करोनारुग्णांची संख्या जागतिक पातळीच्या तुलनेत भारतात कमी.

– देशातील करोना रुग्णांपैकी ९२.८ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात.

 

 

– रुग्णालयात गेलेले रुग्ण इतर वैद्यकीय परिस्थितीमुळे दाखल.

 

 

 

करोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या ‘जेएन-वन’ या उपप्रकाराचे तीन राज्यांत आतापर्यंत २१ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी बुधवारी दिली.

 

 

नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असेही त्यांनी नमूद केले. देशातील वैज्ञानिक करोनाच्या नव्या प्रकाराबाबत संशोधन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

बेंगळुरूमध्ये ६४ वर्षीय नागरिकाचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी बुधवारी दिली. चामराजपेट येथील या रुग्णाला इतर आजारही होते. १५ डिसेंबरला त्याचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. या रुग्णाला जेएन-वन प्रकाराचा संसर्ग झाला होता का, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *