मराठवाड्यातील या गावच्या गावकऱ्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांकडे मागितली गाव विकण्याची परवानगी

The villagers of this village in Marathwada asked the chief minister for permission to sell the village

 

 

 

 

गावात मूलभूत सुविधा नसल्याने तसेच सगळ्या योजना फक्त कागदोपत्रीच झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावात सुविधा नसल्याने गावकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बॅनर लावत गाव विक्री करण्याची परवानगी मागितली आहे.

 

 

 

गावात मूलभूत सुविधा नाहीत त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढण्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पाहावयास मिळाला आहे.

 

 

पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गावात ग्रामस्थांनी गाव विक्रीचे बॅनर लावले आहेत. गावात कसल्याही सुविधा नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बॅनर लावले आहे

 

 

आणि त्यावर थेट गाव विक्री करण्याची अनुमती मागण्यात आली आहे. एक हजार आठशे लोकसंख्या असलेल्या गावात शासनाच्या अनेक योजना

 

 

कागदोपत्रीच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गाव विक्री करण्याचे बॅनर लावल्याने या गावची सध्या चर्चा जिल्हाभर होत असल्याचे पाहायला मिळतेय.

 

 

 

या गावातील विकास कामासाठी वस्तीसाठी अनेक योजना आल्या मात्र यावर मिळालेला पैसा सरपंच आणि इतर अधिकाऱ्यांनी तो उचलून गावासाठी कोणताही विकास न करता खाल्ले असल्याचा आरोप या गावचे नागरिक करत आहेत.

 

 

 

इतक्या वर्षापासून या गावात अनेक गोष्टींचा अभाव आहे या गोष्टी वारंवार तक्रारीच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर मांडूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आता गावकरी संतापले आहेत. त्यामुळे आता गावकऱ्यांनी चक्क गावच विक्रीला काढले आहे.

 

 

 

 

 

जिल्ह्यात हेच गाव नाही तर अनेक गाव असे आहेत ज्यात लोक राहतात. मात्र कोणत्याही सोईसुविधाविना या गावांमध्ये निवडणुका लढवल्या जातात.

 

 

 

 

ग्रामपंचायतमध्ये सरपंच येतो सदस्य असतात मात्र विकास मात्र कागदोपत्रीच होतोय यासाठी जिल्हा प्रशासन हे उदासीन का असाही सवाल या माध्यमातून पुढे येत आहे.

 

 

मात्र आता चक्क पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गावातील नागरिकांनी ही अनोखी शक्कल लढवत चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आता गाव विक्री करण्याची मागणी केली आहे. आता यापुढे नेमकं काय घडतंय हे देखील पाहणं गरजेचं आहे

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *