कोरोनाची वाढता धोका ; शिंदे सरकारने उचललं महत्त्वाचं पाऊल
The increasing threat of Corona; An important step taken by the Shinde government

कोरोना अटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ७ सदस्यीय टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली आहे. आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या नेतृत्त्वात हा टास्कफोर्स काम करेल. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
जगभरासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 हा वेगाने पसरत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे सरकार अॅक्शन मोडमध्ये गेले आहे.
याच पार्श्वभूमीवर शिंदे सरकारकडून सात सदस्यीय टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी टास्कफोर्स काम करणार आहे.
सध्याच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत नव्या व्हेरियंटची लागण झालेले ८३ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ७ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहे.
त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. लोकांना मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना सदृष्य लक्षणं आढळून आल्यास तात्काळ उपचार घेण्यास आणि आवश्यक ती खबरदारी बाळण्यास सांगण्यात आलं आहे.
ऑक्टोंबर ते जानेवारीदरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचा रिकॉर्ड आहे. २०२० ते २०२२ च्या आकडेवारीतून हेच दिसून आलं आहे.
त्यामुळेही सरकार खबरदारी घेत आहे. येत्या काळात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्यातील रुग्णालयांना सज्ज राहण्यास आणि आवश्यक ती तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्यात.
कोरोना व्हायरस JN.1 चे नवीन प्रकार भारतात झपाट्याने पसरू लागले आहे. देशात आतापर्यंत याची लागण झालेले ८३ रुग्ण आढळले आहेत. JN.1 चा सर्वाधिक फटका गुजरातला बसला आहे जेथे 34 प्रकरणे आढळून आली आहेत.
कोविड नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करणारी संघटना INSACOG ने ही माहिती दिली आहे. गुजरात व्यतिरिक्त गोव्यात 18, कर्नाटकातील 8, महाराष्ट्रातील 7, केरळ आणि राजस्थानमधील प्रत्येकी 5, तामिळनाडूमधून 4 आणि तेलंगणातील 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच आठवड्यांमधील आणि 2020 ते 2022 पर्यंतच्या कोरोनाच्या ट्रेंडचा आढावा घेतल्यावर असे दिसून आले आहे की, जानेवारी महिन्यात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ओमिक्रॉनमुळे डिसेंबर ते जानेवारीदरम्यान रोजच्या रुग्णांची संख्या वाढली होती.
येत्या चार आठवड्यांत देशात कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आङे. इतकेच नाही तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढू शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्यांनी INSACOG अहवालाच्या आधारे ही भीती व्यक्त केली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, कोरोना विषाणू JN.1 चे नवीन व्हेरीयंट आतापर्यंत सात राज्यांमध्ये आढळले आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये पहिले चार रुग्ण केरळ, कर्नाटक आणि गोव्यात आढळून आले होते, मात्र आता गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांव्यतिरिक्त ते राजस्थानमध्येही आढळले आहेत. मंगळवारी, जीनोम सिक्वेन्सिंगने राजस्थानमधील पाच रुग्णांमध्ये JN.1 व्हेरीयंटची पुष्टी केली आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन संपल्यानंतर दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच आठवड्यांमधील आणि 2020 ते 2022 पर्यंतच्या कोरोनाच्या ट्रेंडचा आढावा घेतल्यावर असे दिसून आले आहे की, जानेवारी महिन्यात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ओमिक्रॉन व्हेरीयंटमुळे डिसेंबर ते जानेवारीदरम्यान दररोज रुग्णांची संख्या वाढली होती, मात्र फेब्रुवारी महिन्यात हा आलेख घसरण्यास सुरुवात झाली.
सध्या, JN.1 व्हेरीयंट वेगाने पसरत आहे, ज्याचे R मूल्य जास्त आहे म्हणजेच संसर्ग पसरण्याचा दर. अशा परिस्थितीत ख्रिसमस आणि नवीन वर्षामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिसणारी वर्दळ आणखी तीन आठवडे राहण्याची भीती आहे. त्यानंतरच कोरोनाच्या ट्रेंडमध्ये काही बदल अपेक्षित आहेत. त्याचबरोबर, अधिकारी असेही म्हणाले की, कोरोनाचा नवीन व्हेरीयंट किती काळ स्थिर राहू शकतो हे सांगता येत नाही.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, काल देशात कोरोनाचे 412 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा 4 हजार 100 च्या पुढे गेला आहे.
दरम्यान, कर्नाटकात कोरोना संसर्गामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 293 कोरोना रुग्णांनाही निरोगी घोषित करण्यात आले. सध्या देशात 4,170 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत, त्यापैकी 3,096 एकट्या केरळमध्ये आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गुजरातमध्ये नवीन प्रकार आढळून येण्याचे कारण म्हणजे तेथे चाचणी वाढविण्यात आली आहे. केरळमध्ये कोविड-19 ची अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत, परंतु आतापर्यंत JN.1 चे केवळ 5 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
INSACOG डेटा दर्शवितो की नवीन प्रकार JN.1 च्या प्रकरणांमध्ये डिसेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यात वाढ झाली आहे. 24 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात 29 नवीन प्रकरणे आढळून आली.