जरांगेची मुंबईतल्या मोर्चासाठी जोरदार तयारी ;सामाजाला दिल्या सूचना
Jarange's strong preparations for the march in Mumbai; instructions given to the community

मराठा आरक्षणासाठी आता थेट मुंबईत धडक देण्याचा कार्यक्रम आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून आखण्यात आला आहे.
त्यानुसार, २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आरक्षणासाठी जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात होणार आहे. यासाठी राज्यभरातील मराठा सामाजानं मुंबईत यावं, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.
यासाठी मोर्चाचा मार्ग कुठला असेल? आंदोलकांनी सोबत काय घेऊन यायचं? याच्या सूचना जरांगेंनी गुरुवारी मराठा समाजाला दिल्या.
आपण घरी रहायचं नाही. जर आपण घरी राहिलो तर आपल्या मुलांचं वाटोळ होईल, असं भावनिक आवाहन यावेळी जरांगे यांनी केलं आहे.
आंतरवाली ते मुंबई हा पायी मोर्चाचा मार्ग कसा असेल? याची माहिती मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. २० जानेवारी २०२४ रोजी आंतरवालीतून (जालना) सकाळी ९ वाजता मुंबईकडं प्रस्थान.
शहागड मार्गे-गेवराई (बीड)-पाडळशिंगी-मादळमोई-तांदळा मातुरी मार्गे खरवंडी (नगर जिल्हा)-पाथर्डी-तिसगाव -करंजी घाट-अहमदनगर-केडगाव-सुपा-शिरुर (पुणे) -शिक्रापूर-रांजणगाव-वाघोली-खराडीबायपास-चंदननगर-शिवाजीनगर-पुणे-मुंबईहायवे-लोणावळा-पनवेल (नवी मुंबई) -वाशी-चेंबूर-आझाद मैदान(मुंबई)-दादर-शिवाजीपार्क (मुंबई)
त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी जाणाऱ्या मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाजानं सोबत काय वस्तू आणाव्यात याची सविस्तर माहिती देखील जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी व्हावं.
यामध्ये पाण्याचे ड्रम कसे घ्यायचे, वस्तू कशा ठेवायच्या, सोबत जेवणासाठी काय घ्यायचं याचं सविस्तर पत्रक काढून माहिती देण्यात येणार आहे . मुंबईतल्या लोकांची पाण्यासाठी गरज लागणार आहे, त्यांनी मदत करायची आहे.
कोणीही फोटो काढण्यासाठी गर्दी करायची नाही. ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिलं आहे त्यातच आपण चालायचं आहे. कोणीही गट तट ठेऊ नका.
आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची पाहणी करण्यासाठी उद्या एक टीम मुंबईला जाणार आहे. मोर्चाच्या मार्गात जी गावं येणार आहेत त्या गावातील लोकांनी मोर्चेकरांना चालण्यासाठी मदत करायची आहे.