उद्धव ठाकरेंनी सांगितली लोकसभा निवडणुकीची तारीख
Uddhav Thackeray announced the date of Lok Sabha elections
राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. ठाकरे गट या निवडणुकीत तारदीने उतरणार आहे. दरम्यान जागावाटपाच्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.
तसेच निवडणुका ३० एप्रिच्या आत होतील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि वंचितच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीत जागावाटप सुरळीत होईल. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची बोलणी जवळपास झाली आहे. इंडिया आघाडीची बैठक झाली तेव्हा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत बोललो आहे.
बाहेर ज्या बातम्या येत आहेत. त्यावर कोणी लक्ष देऊ नका. आघाडीत बिघाडी मी होऊ देणार नाही. काँग्रेसचे प्रमुख नेते माझ्यासोबत बोलत नाही, तोपर्यंत मी काहीही सांगणार नाही.
वंचित आघाडी बरोबर बोलणी सुरु आहे. काँग्रेस, शिवसेना आणि वंचित, राष्ट्रवादी अशी बैठक घेण्याचे आमचे नियोजन आहे. 12+12+12+12,
असा कुठलाही फॉर्म्युला माझ्यापर्यंत आला नाही. प्रत्येक्ष भेटून निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी बरोबर आमचा प्रश्न सुटला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महाविकास आघाडीत मतभेद नाहीत, असं स्पष्ट केलं. शिवसेना आतापर्यंत २३ जागा लढत आलेली आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत ४८ जागांवर मेरिटच्या आधारावर जागावाटप होईल. जिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद अधिक असेल त्याबाबत विचार केला जाऊ शकतो.
जयंत पाटील आणि आमच्यामध्ये काल चर्चा झाली आहे. शिवसेना महाराष्ट्रातील तळागाळात मुरलेला, संकट पचवून उभा राहिलेला पक्ष आहे, असं संजय राऊत म्हणाले.
जयंत पाटील आणि आमच्यामध्ये काल चर्चा झालेली आहे. वंचित बहुजन आघाडी म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाशी आमची युती झालेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेण्याची भूमिका घेतलेली आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांचं देखील हेच मत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
जिंकण्याचं मेरिट ज्या मतदारसंघात ज्या पक्षाकडे आहे. त्यांना मतदारसंघ सोडला जाईल. हाच निकष महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी लागू असेल, असं संजय राऊत म्हणाले. जिंकेल त्याची जागा हे महाराष्ट्रात मविआचं नाहीतर देशात इंडिया आघाडीचं सूत्र असेल, असं संजय राऊत म्हणाले.
इंडिया आघाडीचा देशभरात जो जिंकेल तो लढेल हाच फॉर्म्युला आहे, असं संजय राऊत म्हणाले. काल जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर आले होते. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कुठं लढेल यासंदर्भातील माहिती दिली. यासंदर्भातील चर्चा केली. काँग्रेस नेत्यांसोबत देखील चर्चा होईल.
आम्ही गांभीर्यानं जागा वाटपावर चर्चा करत आहोत. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत देखील चर्चा सुरु आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
मेरिटवर जागावाटप होईल हेच मुख्य सूत्र आहे, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसचं केडर आहे, काँग्रेसची ताकद आहे, असं म्हटलं आहे.
आज काँग्रेसकडे एकही खासदार नाही, असं म्हटलं होतं. आमच्याकडे १८ होते काही जण निघून गेले आमच्याकडे ६ खासदार आहेत. राष्ट्रवादीकडे आता ३ आहेत. राज्यात मविआ ४० जागांवर विजयी होईल, असं संजय राऊत म्हणाले.