भुजबळ-जरांगे यांच्यात पुन्हा जुंपली
Bhujbal-Jarange clash again

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. तर महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीला राज्यात यश आले नाही, अशी चर्चा सध्या रंगली आहे.
मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या वादामुळे आम्ही पडलो, असे समजू नका. कारण विदर्भात काही तो वाद नव्हता.
तिथेही आपले उमेदवार पडले आहेत, असा दावा केला. मात्र या दाव्यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन सोहळ्यात भाषण करताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, आपण मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलेले आहे. हे आरक्षण टिकणारे आहे.
पण असे असतानाही काही मागण्या जर होत असतील तर त्यांना समजावून सांगितले पाहिजे. असे समजायचे काही कारण नाही की हा जो वाद आहे
त्यांच्यामुळे आम्ही पडलो. कारण विदर्भात काही तो वाद नव्हता. तिथेही आपले उमेदवार पडले आहेत. हिंदुस्तानात तो वाद नव्हता.
काही लोक सांगतात की या वादामुळे उमेदवार पडले. पण दोन-तीन मतदारसंघात हा वाद अजूनही धुसपुसत आहे. परंतु महाराष्ट्रातील एकंदरीत चित्र पाहिले तर काही ठिकाणी छोट्या मोठ्या गोष्टी घडतात.
परंतु संपूर्ण समाज हा आजही एकत्र आहे. मराठा, आदिवासी, दलित समाज अजूनही एकत्र आहे. त्या सर्वांना आपण सोबत घेऊन जाऊयात. काही लोकांना वाटत होते की,
मला बोलावले की त्यांना मते कमी पडतील. मी न जाऊन पण काही फायदा झाला नाही. कोणाला वाटायचे याचा बनार वर फोटो छापला की आपली मते जातील. पण ठीक आहे आता आपल्याला सगळ्यांना काम करायचे आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती आता खालावत आहे.
मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला असून आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगेंना मराठा समाजाला जे आरक्षण दिले आहे ते टिकणारे आहे.
पण असे असतानाही काही मागण्या जर होत असतील तर त्यांना समजावून सांगितले पाहिजे, असे भुजबळांनी म्हटले. यावर जरांगे यांनी तू नको सांगू मला,
माझं मला कळतं, असे म्हटले. तर मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो, असं समजू नका, या भुजबळांनी केलेल्या दाव्यावर मनोज जरांगे यांनी थोडं थांबा कळेल तुम्हाला, असा इशाराच दिला आहे.