आता भाजपमध्ये प्रवेश होणार अवघड

Now it will be difficult to join BJP

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात सलग तिसरी निवडणूक जिंकण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे.

 

 

 

भाजपची सध्याची स्थिती पाहता त्यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे. तसं झाल्यास मोदी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विक्रमाशी बरोबरी करतील. सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळवण्याची किमया आतापर्यंत केवळ नेहरुंना जमली आहे.

 

 

 

लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळेल. बहुमतासह सत्ता राखण्यास मोदी यशस्वी ठरतील, असं सर्व्हे सांगतात. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग होण्याची शक्यता आहे.

 

 

 

त्या पार्श्वभूमीवर भाजपनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. पक्ष प्रवेशाशी संपर्क करणाऱ्या नेत्यांसाठी भाजप आता फिल्टर लावणार आहे. या नेत्यांना प्रवेश द्यायचा की नाही याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन करण्यात आली आहे.

 

 

 

नव्या समितीनं हिरवा कंदिल दिल्यानंतरच अन्य पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल. या समितीची पहिली बैठक ६ जानेवारीला होईल. निवडणुकीनंतर किंवा पक्षाच्या कठीण साथ सोडणाऱ्या नेत्यांचे प्रवेश टाळण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

 

 

 

२०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या अनेक आमदारांनी, नेत्यांनी कमळ हाती घेतलं.

 

 

 

पण ममता बॅनर्जींनी सत्ता राखताच राजकारणाची दिशा बदलून बरेच नेते पुन्हा तृणमूलमध्ये गेले. मुकूल रॉय, बाबुल सुप्रियो सारख्या बड्या नेत्यांनी निकालानंतर घरवापसी केली. असे प्रकार भाजपला टाळायचे आहेत.

 

 

 

लोकसभा निवडणुकीआधी भाजप मजबूत स्थितीत आहे. त्यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्यानं विरोधी पक्षातील नेते भाजपमध्ये जाऊ शकतात. महाराष्ट्र काँग्रेसमधील नेते, आमदारांचा गट भाजपमधील जाईल,

 

 

 

अशी चर्चा अधूनमधून होत असते. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. मध्य प्रदेशातील सत्ता भाजपनं राखली. हिंदी पट्ट्यातील या पराभवानं राज्यातील काँग्रेस आमदारांच्या मनात चलबिचल असल्याचं समजतं.

 

 

 

आमदारांचा मोठा गट भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. पण भाजपनं आता स्थापन केलेली समिती आणि या समितीनं पक्ष प्रवेशासाठी लावलेले फिल्टर त्यातून किती आमदार, नेते पुढे जाणार हा प्रश्नच आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *