इझ्रायलमध्ये फरशी कारागीर,सुतार,मिस्तरी , वेल्डरच्या एक लाख जागावर भरती;पगार महिन्याला 1.37 लाख ;असा करा अर्ज
Recruitment for 1 Lakh Vacancies of Farsi Artisan, Carpenter, Mason, Welder in Israel; Salary 1.37 Lakh per Month; Apply
हमास या दहशतवादी संघटनेशी युद्ध करणाऱ्या इस्रायलमध्ये बांधकाम कामगारांची मोठी कमतरता आहे. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी भारतातून एक लाख बांधकाम कामगारांची मागणी करण्यात आली आहे.
यामध्ये चार प्रकारच्या बांधकामांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सिरॅमिक टाइलचे काम, प्लास्टरिंग, फ्रेम वर्क, शटरिंग सुतार
आणि लोखंडी वेल्डिंगचे काम समाविष्ट आहे. इस्त्राईल निवडक कामगारांना 6,100 शेकेल पगार दिला जाईल, म्हणजे सुमारे 1.37 लाख रुपये प्रति महिना इस्रायली चलनात.
इस्रायलने सिरॅमिक टाइलचे काम, प्लास्टरिंग, फ्रेम वर्क/शटरिंग सुतार आणि लोखंडी वेल्डिंग कामासाठी कामगारांची मागणी केली आहे. यासाठी तुमची वयोमर्यादा २१ ते ४५ वर्षे दरम्यान असावी.
किमान शैक्षणिक पात्रता: हायस्कूल उत्तीर्ण होण्यासोबतच त्यांना संबंधित बांधकाम क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
इंग्रजी बोलणे, समजणे आणि बांधकाम रेखाचित्रे वाचण्यास सक्षम असणे अनिवार्य आहे. वैध पासपोर्ट असणे आवश्यक आहे.
इस्रायलमध्ये बांधकाम कामगार म्हणून नोकरी मिळविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना nsdcjobx.com या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
त्यानंतर निवडलेल्या कामगाराला तपासणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर त्याच्या निवडीबाबत निर्णय घेतला जाईल. इस्त्रायली तज्ज्ञांची टीम ३० जानेवारीपर्यंत गरजेनुसार बांधकाम कामगारांची निवड करेल.