आमदाराच्या घरावर ईडीची धाड

ED raid on MLA's house

 

 

 

 

 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या म्हणजेच बुधवारी ४ वाजता निकाल जाहीर करणार आहे.

 

 

त्यामुळे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कुणाचे आमदार अपात्र होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत.

 

 

 

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर अडचणीत सापडले असून त्यांच्या घरावर मंगळवारी सकाळीच ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने वायकर यांच्या ७ ठिकाणांवर ही छापेमारी केल्याची माहिती आहे.

 

 

त्यामुळे आमदार वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बीडमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे.

 

 

४० वर्षापासून शिवसेनेसोबत निष्ठावंत असलेले माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे.

 

 

 

मंगळवारी ते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी अनिल जगताप हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

 

 

 

मुंबईला निघण्यापूर्वी जगताप यांनी बीडमध्ये शक्तीप्रदर्शन देखील केलं आहे. त्याच्यापाठोपाठ जवळपास ५०० गाड्या कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईला जाण्यासाठी निघाल्या आहेत. अनिल जगताप यांचा बीडमध्ये मोठा दबदबा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

 

 

 

 

आता ते एकनाथ शिंदे यांना साथ देणार असल्याने शिंदे गटात आनंदी आनंद आहे. सुषमा अंधारे यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून आपण ठाकरे गटाला

 

 

 

सोडचिठ्ठी देत असल्याचं जगताप यांनी जाहीर केलं आहे. एकीकडे आमदार अपात्रतेचा निकाल तोंडावर असताना दोन मोठे धक्के बसल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

 

 

 

दरम्यान ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची अलिबाग येथील एसीबी कार्यालयात उद्या (10 जानेवारी 2023) चौकशी होणार आहे. वैद्यकीय कारणास्तव राजन साळवी यांच्या वहिनी चौकशीला गैरहजर राहणार आहेत.

 

 

तर, साळवी यांचे बंधू आणि पुतण्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. एसीबीसमोर ज्यावेळी साळवी यांचे कुटुंबीयांसोबत चौकशीला हजर राहणार आहेत. त्याचवेळी त्यांच्यासोबत स्वतः राजन साळवीही उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

भविष्यात मला कितीही त्रास झाला, अटक झाली, तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असं कुटुंबीयांच्या एसीबी चौकशीबाबत बोलताना आमदार राजन साळवी म्हणाले आहेत.

 

 

पुढे बोलताना ते म्हणाले की, उद्या माझी आणि माझ्या कुटुंबीयांची एसीबी चौकशी आहे. भविष्यात मला कितीही त्रास झाला अटक झाली तरी मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. तसेच, मी शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार कुठेही जाणार नाही, उदय सामंत यांनी राजापूर येथे बोलताना केलेल्या टीकेला राजन साळवी यांनी उत्तर दिलं आहे.

 

 

आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावरही राजन साळवींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “उद्याचा निकाल आमच्या बाजूने लागेल हा आम्हाला विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेले निर्णय पाहता, त्यामध्ये केलेले उल्लेख पाहता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमच्या बाजूने निर्णय देतील.”

 

 

 

राजापूरचे उद्धव ठाकरे समर्थक आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीमुळं निर्माण झालेल्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. लाचलुचपत विभागानं काही दिवसांपूर्वी राजन साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलेलं.

 

 

तसेच, काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी एसीबीकडून करण्यात आली होती. त्यावेळी अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं.

 

 

 

 

राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळं एसीबी चौकशी आणि त्यांना लागणारी माहिती यासाठी राजन साळवींनी आतापर्यंत तीनवेळा अलिबागच्या एसीपी कार्यालयात हजेरी लावली आहे. त्यानंतर एसीबीकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं.

 

 

 

त्यात घर आणि हॉटेलच क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग अर्थात सजावटीसाठी करण्यात आलेला खर्च यांचं मूल्यांकन करण्यात आलं आहे. यासर्व प्रकाराबाबत बोलताना या साऱ्या गोष्टी राजकीय दबावापोटी सुरू असल्याचा आरोप राजन साळवींनी केला होता.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *