मोदींनी मुंबईत अचानक भाषण आटोपत घेऊन तडकाफडकी निघून गेले ! काय घडले कारण ?
Modi suddenly ended his speech in Mumbai and left in a hurry! What happened because?

अटल सेतू – मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरु असतानाच त्यांनी ते आवरत घेतलं
आणि तडकाफडकी निघून गेले. पण मोदींनी असं काय केलं याची चर्चा मात्र सुरु झाली. या चर्चेचं कारणही आता समोर आलं आहे.
अटल सेतूचं उद्घाटनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी या समुद्रातील सेतूवरुन प्रवासही केला. प्रवासानंतर दुसऱ्या टोकाला मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषण झाली.
त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील काही रेल्वे मार्गांचं उद्घाटनं आणि लेक लाडकी योजनेंतर्गत काही लाभार्थ्यांना चेकचं वाटप करण्यात आलं.
त्यानंतर मोदी भाषणासाठी उभे राहिले. त्यांचं भाषणंही सुरु झालं, यामध्ये त्यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना विरोधकांवर टीकाही केली.
यावेळी मोदींनी वेगानं आपलं भाषण उरकत असल्याचं दिसलं. अखेर भाषण आवरत घेत त्यांनी तातडीनं बाहेर जाण्यासाठी निघाले.
माध्यमांकडून याचं थेट प्रक्षेपण सुरु होतं. पण मोदींचं भाषण केव्हा संपलं आणि ते केव्हा बाहेर पडले हे कळूनच आलं नाही.
मोदींच्या या घाई-गडबडीमुळं नेमकं काय घडलं याची राजकीय वर्तुळात तसेच जनतेतही चर्चा सुरु झाली. याबाबत सकाळनं स्थानिक पोलिसांकडून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी मोदी घाईत का निघून गेले याचा खुलासा केला.
पोलिसांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर सूर्यास्ताआधी टेक ऑफ घेणं अपेक्षित होतं. त्यामुळे संध्याकाळी ६.०२ पर्यंत मोदींनी आपला कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरमध्ये बसणं अपेक्षित होतं.
पण, मोदींचं भाषणच ६ वाजून ४ मिनिटांपर्यंत चाललं. कारण सूर्यास्ताआधी हेलिकॉप्टरनं टेक ऑफ घेताच मोदी मुंबईकडे रवाना होणार होते. त्यानंतर मुंबईहून मोदींचा विमानानं दिल्लीकडे प्रवास होणार होता.
त्यामुळे मुंबईतल्या कार्यक्रमातलं भाषण आटोपताच मोदी हे मंचावरुन तडकाफडकी निघून जाताना दिसले. शेड्युलनुसार त्यांना नवी मुंबईतून ५.४५ वाजताच निघणं अपेक्षित होतं.
पण कार्यक्रम लांबला तर जास्तीत जास्त ६ पर्यंतची वेळ देण्यात आली होती. जेणेकरुन सूर्यास्ताआधी हेलिकॉप्टर नवी मुंबईतून टेक ऑफ घेईल अन् वेळेत मुंबईत पोहचेल.