महायुतीच्या मेळाव्यात माजी मंत्र्याने थेट स्टेजवरून भाजपचे कान उपटले
At the Mahayuti gathering, the former minister directly grabbed the BJP's ears from the stage

महायुतीच्या मेळाव्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या व्यथा मांडली. निवडणूक आली की भाजपला आमची आठवण येते, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी टीकेची झोड उठवली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने आता पासूनच जोरदार तयारी सुरू आहे. याचा पहिला टप्पा म्हणून आज प्रत्येक जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षांचा मेळावा संपन्न होत आहे.
सांगलीत देखील घटक पक्षांचा मेळावा संपन्न झाला. मात्र, या मेळाव्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भावनांना वाट करून देत मित्र पक्ष असलेल्या
भाजपला कोपरखळ्या मारत चांगलेच कान उपटले. मित्र पक्षांना निवडणुकीच्या तोंडावर बैठकीला बोलावले शेवटी का होईना आमची आठवण झाली आशा शब्दात त्यांनी टीका केली.
सांगलीतील खरे क्लब हाऊस मध्ये महायुतीच्या घटक पक्षाचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास भाजपचे खासदार संजयकाका पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ आमदार अनिल बाबर,
रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत, जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह अन्य पक्षांचे नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, २०१४ पासून भजाप सोबत घटकपक्ष म्हणून आम्ही आहे. २०१९ ला सरकार गेल्यानंतर छोटे घटक बाजूला गेले नाही ते भाजपसोबत राहिले. त्याकाळात सत्ता नसताना आम्ही लढलो, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
आम्ही घटकपक्ष चळवळीतील लोक आहोत. काही का असेना शेवटच्या काळात निवडणूक जवळ आल्यानंतर आमची आठवण झाली. आम्ही पण आता खुरपी घेऊन आलोय, तण काढतोया.
पण आम्हाला उपेक्षित ठेऊ नका. सत्तेच्या काळात घटक पक्षांना सन्मान दिला नाही, निधी दिला नाही. परंतु, बारीक बारीक घटक पक्षांना तुम्ही बोलवायला पाहिजे होते.
आम्ही मागितलं की तुमचं रान उलटलं, असं करू नका. तुम्ही आम्हाला काही द्या अथवा न द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.