ठाकरे गटाला बळ देण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात

Rashmi Thackeray is now in the field to strengthen the Thackeray group ​

 

 

 

 

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची सर्वत्र जोरदार तयारी सुरू असताना ठाकरे गटाच्या महिला आघाडीनेही प्रचाराच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

 

 

 

विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद’ यात्रा आयोजित करण्यात आली आहे. येत्या १६ जानेवारीला विदर्भापासून या यात्रेची सुरुवात होणार आहे.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मधल्या काळात ठाकरे यांच्या पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात खेचताना एकप्रकारचे आव्हान दिले आहे.

 

 

 

त्यामुळे ठाकरे यांच्या गटाच्या महिला आघाडीच्या माध्यमातून राज्यातील पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न या यात्रेच्या निमित्ताने होणार आहे.

 

 

याशिवाय लोकसभा निवडणुच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील मतदारसंघात पक्षाची किती ताकद आहे याची देखील या यात्रेच्या निमित्ताने चाचपणी केली जाणार आहे.

 

 

 

उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाची स्त्रीशक्ती संवाद यात्रा विदर्भातून सुरू होणार आहे.

 

 

 

 

या यात्रेच्या निमित्तो विदर्भातील महिलांशी संवाद साधला जाईल. पक्षाच्या उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे,

 

 

संजना घाडी, राजूल पटेल, शीतल देवरुखकर आणि रंजना नेवाळकर संपूर्ण विदर्भातील विधानसभेचा सखोल आढावा घेणार आहेत.

 

 

देवेंद्र फडणवीस पूर्ण उपमुख्यमंत्री नाहीत. त्यात वाटेकरी आहेत, त्यामुळे त्यांनी त्यावर बोलावे. राम मंदिरासंदर्भात शिवसेनेचे योगदान काय आहे? हे जगातील प्रत्येक हिंदूला माहीत आहे.

 

 

 

तेव्हा देवेंद्र फडणवीस गोधडीत रांगत होते. राम मंदिरावर तुम्ही शिवसेनेला काय प्रश्न विचारता? तुम्हालाच प्रश्न विचारायला हवा, तुम्ही कुठे होतात असे प्रश्न खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना उद्देशून सोमवारी केले.

 

 

 

डरपोक नेते अयोध्येचे मैदान सोडून पळून गेले. या पळपुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिराच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारण ही संघनीती आहे,

 

 

 

स्वत:चा नामर्दपणा लपवायचा आणि दुसऱ्याच्या शौर्यावर बोट ठेवायचे असाच हा प्रकार असून हा रामाचा अपमान आहे, असेही ते म्हणाले.

 

 

मातोश्री निवासस्थानास धोका असल्याच्या इशाऱ्याबाबत विचारले असता, हे जे कोणी तरुण आहेत, काय आहेत, ते आम्हाला माहिती आहे.

 

 

 

राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुस्लिम नावं धारण केली होती. लोकसभा निवडणुकीआधी धार्मिक तेढ निर्माण करून निवडणूक जिंकायची हे भाजपचे कारस्थान आहे,

 

 

 

असा आरोप त्यांनी केला. ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची असून महाराष्ट्राच्या डाउटफूल सरकारची नाही, ते सूडाने पेटलेले आहेत, असेही ते म्हणाले.

 

 

 

वरळी डोम येथे मंगळवारी दुपारी चार वाजता उद्धव ठाकरे यांची काही कायदे पंडितांसोबत महापत्रकार परिषद आहे. तिथे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

 

 

देशभरातील पत्रकारांना आम्ही निमंत्रित केले आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर तिथे चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *