मराठा समाजाला OBC तुन आरक्षण देण्यासाठी भुजबळांनी सांगितला फार्मुला
Bhujbal told the formula to give reservation to Maratha community from OBC

मराठवाड्यात कुणबी नोंदी तपासण्यासाठी मनुष्यबळ कमी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मराठवाड्यात कुणबी नोंदी तपासण्याचे काम वेगाने वाढवण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदी तपासण्याच्या कामात लक्ष द्यावे, अशी विनंती मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
‘५० टक्के आरक्षण आधीच दिलं आहे. यात केंद्र सरकारनं १० टक्के आरक्षण इब्लूएस यांना दिलं आहे. आता १० ते १२ टक्के वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे,’ असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. यावरही जरांगे-पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा. मग, ७५ काय ९० टक्क्यापर्यंत आरक्षण वाढवा. आम्हाला गाजर दाखवण्याचं काम करू नये. आम्हाला हक्काचं आरक्षण मिळत आहे आणि मिळवणारच,” असं प्रत्युत्तर जरांगे-पाटलांनी छगन भुजबळांना दिलं आहे.
मारवाडी, लिंगायत, आदिवासी, मुस्लीम, धनगरमधील काही जाती कुणबीत असलेल्या नोंदी आढळलेल्या आहेत. मग, यांना ओबीसीचा लाभ द्यावा का? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यानंतर जरांगे-पाटील म्हणाले,
“मराठ्यांच्या नोंदी असूनही आम्हाला ओबीसी आरक्षण मिळत नाही. या समाजाचा ओबीसीत समावेश करायचा का नाही? याचं उत्तर भुजबळांनी दिलं पाहिजे. आमचा याला कुठलाही विरोध नाही.”
“छगन भुजबळ या समाजाच्या विरोधात जाणार का? मराठ्यांविरोधात खूप आगपाखड करण्याचं काम करत होते. छगन भुजबळांनी विरोध करणे बंद करावे. आम्हीही विरोध करणार नाही,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं