“तो” व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर अजित पवार संतापले,म्हणाले ,…..!
Ajit Pawar got angry on the viral video, said,.....!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि बाणेदार स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा ते विविध घडामोडींवर प्रतिक्रिया देत असतात. अशात त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला.
त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ते दाटीने कारमध्ये बसताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे,
अजित पवार सगळेच दाटीने बसलेले या व्हिडीओत दिसत आहेत. याबाबत आज अजित पवारांना विचारलं असता तो व्हिडीओ व्हायरल करणारे मूर्ख आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
व्हिडीओ व्हायरल करणारे इतके मूर्ख लोक आहेत की आता काय बोलू. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौऱ्यामध्ये प्रत्येक कारमध्ये कुणी बसायचं ठरलेलं असतं.
कारमध्ये चालकाच्या शेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. पाठीमागे मी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे होते. मात्र आमचे सहकारी गिरीश महाजन यांना चेहऱ्याला जखम झाली. त्यांना तिथे कार राहिली नाही. सगळा ताफा निघून गेला. मी त्यांना म्हटलं आपण दाटीवाटीने पुढे जाऊ.
आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही. आम्ही सगळ्यांना सामावून घेणारी माणसं आहोत. त्यामुळे मला त्या गोष्टीला काही महत्त्व द्यावं वाटत नाही. जागा असताना आम्ही कुणाला नाही म्हटलं नाही. इतर कारच्या ताफ्यापर्यंत येईपर्यंत आम्ही गेलो. जे व्हिडीओ व्हायरल करत आहेत त्यांची मला कीव करावीशी वाटते.
आपण विकासाबाबत बोलू की, कारमध्ये कोण कसं गेलं ते कारमध्ये बसणारे पाहून घेतील. आम्हाला काय ठरवायचं आहे ते आम्ही ठरवू. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात राज्यकारभार चालवण्यासाठी एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. तसेच तीन मोठे आणि अनेक छोट्या पक्षांनी महायुतीत एकत्र येत सरकार बनवलं आहे.
भाजपा आणि शिवसेनेचं (शिंदे गट) बहुमतातलं सरकार अस्तित्वात असतानाही २ जुलै २०२३ या दिवशी महायुतीने ऱाष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला आपल्याबरोबर घेतलं.
अजित पवार, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दाटीने कारमध्ये बसतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही यावरुन टोला लगावला. आता अजित पवारांनी या प्रकरणी उत्तर दिलं आहे.
सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन तथा ग्रामविकस मंत्री गिरीश महाजन,
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दाटीवाटीने बसून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे की,
“जर केली नसती सुरत गुवाहाटी, तर कशाला झाली असती दाटीवाटी.” असं कॅप्शन देऊन त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला होता.