भाजप खासदाराची झाली पंचाईत;महिलेला विचारलं घर मिळालं, कुणी पैसे घेतले का? पाहा;VIDEO

BJP MP's panchayat held; woman asked if she got a house, did anyone take money? see

 

 

 

 

 

लोकसभेच्या तयारीसाठी भाजपने देशभरातील राज्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू केलीय. आज ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उत्तर प्रदेशातील बरेली येथील पोहोचली होती.

 

 

या कार्यक्रमात भाजप पदाधिकारी आणि शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. भाजप खासदार पीएम आवास योजनेचे लाभार्थ्यांना प्रतिकात्मक घराची चावी देत होते.

 

 

 

याच कार्यक्रममधील एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, भाजप खासदाराने या वृद्ध महिलेला पीएम आवास योजनेंतर्गत घराची चावी देत आहेत.

 

 

त्यावेळी त्यांनी या महिलेला प्रश्न केला. घरासाठी त्यांनी कोणाला पैसे दिले का? असा प्रश्न केला. त्यावर महिलेलं दिलेल्या उत्तरामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या पायाखालील जमिनी सरकली. या महिलेचं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

व्हिडिओमध्ये भाजपचे खासदार धर्मेंद्र कश्यप दिसत आहेत, त्यांनी एका वृद्ध महिलेला प्रश्न करताना दिसत आहेत. घर मिळाल्यानंतर कसं वाटत आहे, त्यावर ती महिला म्हणते चांगलं वाटतं.

 

 

 

त्यानंतर खासदार कश्यप यांनी परत एक प्रश्न केला. महिलेला घराची चवी देताना कश्यप म्हणाले, पीएम आवास योजनेसाठी कोणाला पैसे किंवा कोणाला लाच दिली का? हो, ३० हजार रुपये दिल्याचं उत्तर त्या महिलेने दिलं. महिलेचं उत्तर ऐकून खासदार आणि इतर पदाधिकारी हसू लागले.

 

 

 

परंतु प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या पायाखाली जमीन सरकली. वृद्ध महिलेने उत्तर दिल्यानंतर खासदारांना सरकारी कर्मचाऱ्यांना इशारा दिला.

 

 

हा गंभीर प्रकार असल्याचं म्हणत त्यांनी महिलेला विचारलं की, कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल त्याचं नाव द्यावं. दरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतलीय.

 

 

 

ही बाब माझ्या निदर्शनास आली असून या प्रकरणाचा तपास अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी प्रशासन व्ही. के. सिंह यांच्याकडे सोपवण्यात आलाय, असे बदायू जिल्हा दंडाधिकारी मनोज कुमार यांनी म्हटले आहे.

 

 

दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. नम्रपणे मान्यवरांची तक्रार केली. नागरिकांचा इतका साधेपणा नम्रपणा चांगला नसल्याचं एका युझरने म्हटलं आहे.

 

 

 

तर दुसऱ्या युझरने म्हटलं की, भाजपची डबल इंजिन सरकार गरिबांकडून पैसे उकाळते. मोदी जी पाहिलं का काय होतंय ते, कुठे आहे तुमची गॅरंटी? पीएम आवास योजनेनेसाठी लाच घेणाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असं एका युझरने म्हटलं आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *