पंकजा मुंडेंनी दिला मनोज जरांगेंना आता घोषणा बदलण्याचा सल्ला

Pankaja Munde advised Manoj Jarang to change the slogan now

 

 

 

 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातून मुंबईच्या वेशीपर्यंत पदयात्रा काढली. मुंबईच्या वेशीपर्यंत आल्यानंतर शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.

 

 

 

जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये मराठा आरक्षावर भाष्य केलं आहे. ‘एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं.

 

 

 

लोकांमधील वितुष्ट कमी करावं, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. तर यावेळी सरकारने ओबीसीला धक्का कसा लागला नाही ?

 

 

 

हे समजावून सांगावं, असं आवाहन मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना केलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.

 

 

 

‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, लागणार नाही. मी हे वाक्य लोकांकडून ऐकत होते. मात्र धक्का लागलाच. कुणबी प्रमाणपत्र हे ओबीसीत येतं. त्यामुळे धक्का लागला नाही, असं म्हणणं अयोग्य आहे’.

 

 

‘ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला यामुळे नक्कीच धक्का लागलेला आहे. जे सत्तेत विराजमान आहेत, ते जर म्हणत असतील ओबीसींना धक्का लागला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजून सांगावं, कसा धक्का लागला नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *