मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक राणे अचानक का शांत झाले;चर्चाना उधाण !
Why did the aggressive Rane suddenly calm down on the issue of Maratha reservation?
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मराठा आरक्षणावर पत्रकार परिषद घेणार होते. पण अचानक त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली, त्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मात्र, राज्य सरकारनं मराठा आरक्षणावर घेतलेल्या भूमिकेवर आक्रमक झालेले नारायण राणे आता मवाळ झाले आहेत. त्यामुळे राणेंची पत्रकार परिषद रद्द करण्यासाठी ‘वरून’ आदेशाचा फोन आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, पत्रकार परिषद रद्द झाल्यानंतर नारायण राणे ट्विट केलं आहे. त्यातून नारायण राणेंचा आक्रमकतेचा सूर आता विनंतीवर येऊन पोहोचला असल्याचं स्पष्ट दिसतं.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांना दिलेल्या अधिसूचनेविरोधात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लढवय्येपणाचा वारसा
आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन राणेंनी या ट्वीटमधून केलं आहे.
स्वाभिमानी मराठा स्वत:ला कुणबी समाजामध्ये समाविष्ट करून आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्यानेृं इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार आहे, याकडेही नारायण राणेंनी ट्विटमधून लक्ष वेधले आहे.
या सगळ्या नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या 32 टक्के म्हणजे 4 कोटी एवढी आहे. कोणत्याही पदापेक्षा जात,
धर्म आणि देश महत्त्वाचे आहेत एवढंच मला सांगावंसं वाटतं, या सौम्य शब्दांत नारायण राणे यांनी महाराष्ट्र सरकारला आवाहन केलं आहे.
शनिवारी (27 जानेवारी) जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटील यांचं उपोषण सोडवलं आणि सगेसोयरे शब्दाचा समावेश केल्याची अधिसूचना काढली
त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्रमक प्रतिकिया दिली होती. सरकारने हे योग्य केलं नाही, असं म्हणत त्यांनी सरकारला घरचा अहेर दिला होता.
त्यानंतर त्यांचा सूर नरमला असल्याचे ट्वीटवरून दिसते. यावरून नारायण राणे यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? किंवा त्यांना थेट वरून फोन आला असल्याची चर्चा देखील सुरू आहे. कारण त्यांनी पत्रकार परिषद रद्द करून ट्वीट करून भावना व्यक्त केल्या.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना काढल्याने मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार असल्यानं भुजबळ
यांनी पुढील रणनीती ठरवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात केलं होतं. ओबीसी आणि इतर समाजातील नेते भुजबळांच्या निवासस्थानी दुसऱ्या दिवशीही जमले असून मॅरेथॉन बैठक झाली आहे.
ओबीसींचं आरक्षण संपणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. फडणवीस भेटतील तेव्हा त्यांना सांगेन, मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या!.
त्यांना कशाला आमच्यात घुसवत आहात? त्यांना आरक्षण द्यायला सुरुवात झाली, थांबवा. ओबीसींचं आरक्षण जातंय याचं दु:ख आणि संताप आहे. मला कोणतीही अभिलाषा नाही. त्यांना सांगा मला काढून टाका, असंही राणे म्हणाले होते.