इंडिया आघाडीचे जागा वाटप कसं होणार? मल्लिकार्जुन खरगेंनी दिली माहिती ;पहा VIDEO
How will India Aghadi seats be distributed? Information given by Mallikarjun Kharge; see VIDEO
पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आजची इंडिया आघाडीची निर्णायक बैठक झाली. जागा वाटपातील तिढा कसा सोडवायचा आणि निवडणुकांच्या विजयाची रणनीती कशी आखायची यासंदर्भात
या बैठकीत चर्चा झाल्याचं मल्लिकार्जुन खरगेंनी माध्यमांना सांगितलं. तसंच, खासदारांना निलंबित केल्यावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
“आजच्या चौथ्या बैठकीत २८ पक्षांनी सहभाग घेतला होता. या २८ पक्षाच्या नेत्यांनी त्यांची मते समितीसमोर ठेवली आहेत. समस्या सोडवण्याकरता संपूर्ण देशभर ८ ते १० बैठका सर्वांनी मिळून करण्याचा निर्णय झाला. आजची बैठक दोन ते तीस चालली”, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
“१५१ खासदारांना सभागृच्या बाहेर टाकून सरकार चालवत आहे. हे लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकशाहीला वाचवायचं असेल तर आपल्याला एकत्र येऊन लढावं लागेल आणि त्यासाठी आपण सर्व तयार आहोत.
देशाच्या लोकशाहीत हे पहिल्यांदाच घडलं आहे की. जो मुद्दा सभागृहात उचलला आहे तो चुकीचा नव्हता. जे लोक सभागृहाच्या आतमध्ये आले, ते कसे आले? त्यांना कोणी आणलं?
कोणत्या प्रकारे त्यांनी सर्व ठिकाणी जाऊन घोषणाबाजी केली. आम्ही आधीपासूनच सांगत आलोय की गृहमंत्री आणि पंतप्रधांनांनी सभागृहात यावं आणि जे घडलंय त्याबाबत सभागृहात माहिती द्यावी. परंतु, त्यांनी ऐकलं नाही”, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
“मला कळत नाही, सभागृह सुरू असताना हे विविध ठिकाणी उद्घाटनाला जातात. हे काय सुरू आहे. असं कधीच नाही झालं. सगळीकडे भाषण द्यायला जातात पण, लोकसभा आणि राज्यसभेत हे येत नाहीत.
लोकशाही संपवायची यांची इच्छा आहे. १५१ लोकांचं निलंबन करून त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. हे पहिल्यांदाच घडलं आहे. हे अत्यंत वाईट आहे. या विरोधात आम्ही लढणार आहोत.
याविरोधात आम्ही मैदानात जाणार आहोत. आज पंतप्रधान आणि गृहमंत्री समजत आहेत की त्यांच्याशिवाय या देशात कोणीच नाही, तर त्यांचा हा समज संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
सर्वजण मिळून आंदोलन करणार आहोत. २२ डिसेंबर रोजी आम्ही देशभर याविरोधात आंदोलन करणार आहोत”, असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
“इंडिया आघाडीचा एक मुद्दा आहे, सर्व लोक मिळून काम करतील. राज्या-राज्यातील नेते एकत्र येऊन जागा वाटपाबाबत चर्चा करतील. राज्यांतर्गत हा प्रश्न हाताळता नाही आला तर त्यावर इंडिया आघाडीचे नेते यावर चर्चा करतील.
तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेशातील समस्या यामुळे सुटतील. दिल्ली, पंजाबमधील समस्याही सोडवल्या जातील. हे आजच्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. या बैठकीत २८ पक्षातील नेत्यांनी सहकार्य केलं”, असंही खरगे म्हणाले.
पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आम्हाला आधी सर्वांना जिंकून यावं लागणार आहे.
जिंकण्यासाठी काय करायचं आहे, याचा विचार करावा लागेल. पंतप्रधान कोण होणार ही नंतरची गोष्ट आहे. खासदारच नाही आले तर पंतप्रधान ठरवून काय फायदा? त्यामुळे आधी आम्ही संख्या वाढवण्याकरता एकत्रितपणे लढून बहुमत आणण्याचा प्रयत्न करू.
“एक-दोन निवडणुका झाल्यानंतर मोदींना प्रचंड गर्व आला आहे की संपूर्ण जगात मीच एकटा नेता आहे, असं त्यांना वाटू लागलं आहे. त्यामुळे आम्ही आधी जिंकण्याचा प्रयत्न करू आणि एक होऊन आम्ही लढू”, असंही ते म्हणाले.
आज INDIA गठबंधन की चौथी बैठक हुई। इस बैठक में 28 दलों के नेता शामिल हुए और उन्होंने अपने विचारों को सबके सामने रखा।
सभी ने एकजुट होकर गठबंधन को मजबूत करने और लोगों के हित से जुड़े मुद्दों को उठाने पर बात की।
आने वाले समय में सभी ने मिलकर 8 से 10 बैठक करने का फैसला भी किया है,… pic.twitter.com/XH1ax9EuCe
— Congress (@INCIndia) December 19, 2023
पूरे देश में 22 दिसंबर को सदन से विपक्षी सांसदों के निलंबन के खिलाफ विरोध प्रदर्शन होगा।
हम लड़ेंगे और डटे रहेंगे..
: INDIA गठबंधन की बैठक में कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge pic.twitter.com/oogTMgb27J
— Congress (@INCIndia) December 19, 2023
LIVE: Press briefing by INDIA parties in New Delhi. https://t.co/2cYuT7Hhve
— Congress (@INCIndia) December 19, 2023