अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढला ,सरकार धोक्यात ?

Independent MLAs withdraw support from BJP government, government in danger?

 

 

 

 

देशात सगळीकडे लोकसभा निवडणुकीचं वातावरण असताना हरियाणात मात्र भाजप सरकार धोक्यात आलं आहे. नायब सिंग सैनी यांच्या सरकारला संकटाचा सामना करावा लागत आहे.

 

 

 

भाजप सरकार आता अल्पमतात आले आहे. हरियाणा काँग्रेसने हा दावा केला आहे. अपक्ष आमदारांनी भाजपला दिलेला पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली.

 

 

 

 

 

त्यामुळे हे राजकीय संकट निर्माण झाले आहे. हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान म्हणाले की, हरियाणा विधानसभेचे सध्याचे संख्याबळ ८८ आहे.

 

 

 

 

भाजपकडे ४० आमदार आहेत. याआधी भाजप सरकारला जेजेपी आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता, मात्र आता जेजेपी

 

 

आणि अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने सैनी सरकारने बहुमत गमावले असून त्यांना एक मिनिटही सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही.

 

 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी हरियाणातील भाजप सरकारला अपक्ष आमदारांनी झटका दिला आहे. अपक्ष आमदार सोंबीर सांगवान,

 

 

 

 

रणधीर गोलन आणि धरमपाल गोंदर यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन अपक्ष आमदारांनी

 

 

 

 

काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केलीये. रोहतकमध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा आणि उदय भान यांच्या उपस्थितीत अपक्ष आमदारांनी ही घोषणा केली.

 

 

 

 

धरमपाल गोंदर म्हणाले की, “आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत. आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर आम्ही हा निर्णय घेतला आहे.”

 

 

 

 

उदय भान म्हणाले, “तीन अपक्ष आमदार सोंबीर सांगवान, रणधीर गोलन आणि धरमपाल गोंडर यांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

 

 

 

 

 

रोहतक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दीपेंद्र सिंह हुडा म्हणाले की, राज्यातील परिस्थिती भाजपच्या विरोधात झाली आहे. बदल निश्चित आहे.

 

 

भाजप सरकार अल्पमतात आले आहे. त्यांनी 48 आमदारांची यादी दिली आहे, त्यापैकी काहींनी लोकसभा निवडणूक लढवत असल्याने राजीनामा दिला आहे. काही अपक्ष आमदारांनी आज भाजपचा पाठिंबा काढून काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *