बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या पोलीस निरीक्षकाला अटक

Police inspector arrested for getting job on fake certificate

 

 

 

 

मध्य प्रदेशच्या इंदूरमधून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी हडपल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशात पोलीस निरीक्षकाची २३ वर्षापूर्वींची चोरी समोर आली आहे.

 

 

 

पोलिसाच्या नोकरीसाठी बोगस जातप्रमाणपत्र जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षकाच्या विरोधात ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

मीडिया रिपोर्टनुसार, आरोपीचं नाव सत्यनारायण वैष्णव असून ४ ऑगस्ट १९८३ साली पोलिसाची नोकरी मिळवली. सत्यनारायणने पोलीस विभागात कोरी समाजाचं बोगस जातप्रमाणपत्र जमा केलं होतं.

 

 

 

सत्यनारायणने २३ वर्ष पोलिसाची नोकरी केली. सत्यनारायणने बोगस जातप्रमाणपत्र जमा करून २३ वर्ष नोकरी केल्याने त्याच्यावर ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

इंदूरचे प्रशासकीय अधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी सांगितलं की, बोगस प्रमाणपत्र प्रकरण समोर आल्यानंतर सत्यनारायण वैष्णव यांच्यावर कारवाई सुरु केली आहे.

 

 

 

सत्यनारायणवर ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण पोलीस कोर्टात सुरु आहे. कोर्टाने ४ हजार रुपयांच्या दंडासहित ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *