लोकसभा निवडणूकित खर्चासाठी असे आहेत दर

These are the rates for Lok Sabha election expenses

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा यावर्षी ९५ लाखांपर्यंत आहे. निवडणुकीसाठी मंगल कार्यालय, व्हिडीओ कॅमेरा, चहा, नाश्त्यासह जेवणाच्या दर हे सध्याच्या बाजारभावानुसार ठरविण्यात आले आहेत.

 

 

 

जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त लेखाधिकारी शैलेश मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे दर निश्‍चित केले आहेत. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी या दरांना मान्यता दिली आहे.

 

 

 

 

प्रचार सभांसाठी मंगल कार्यालय ५० हजार रुपये प्रती दिन, हॉटेलमधील विविध प्रकारांतील एक रुम ९९९ ते ७ हजार रुपये प्रती दिन, दुचाकी इंधनासह ३५० ते ७०० रुपये प्रती दिन,

 

 

 

व्हिडीओग्राफी १ हजार ३८९, एल. ई. डी. १० हजार १२५, कॅमेरा क्रेनसह (३२ फूट) १३ हजार २५० रुपये असे दर निश्‍चित करण्यात आले आहेत.

 

 

 

 

व्यासपीठ (प्रति चौरस फूट) मंडप, नेट, स्वागत गेट मोठे, खुर्ची, कुशन खुर्ची, फिरती खुर्ची, मॅट्रेस बेडशीटसह व लोड, टेबल, कापडी कानात, ताडपत्री,

 

 

 

व्हीआयपी टी-पॉय, साधा टी-पॉय, जनरेटर इंधनसह, ध्वनीक्षेपक, माईक ॲम्प्लिफायर प्रतितास, ट्यूबलाइट, हॅलोजन, फॅनचे अंतिम दर देखील निश्‍चित केले आहेत.

 

 

 

खाद्य पदार्थांसाठी दर निश्‍चित करण्यात आले आहे. चहाच्या एका कपासाठी १० रुपये, कॉफी १५ रुपये, पाण्याची बाटली १७ रुपये, पाण्याचा जारसाठी ४० रुपये,

 

 

 

वडा-पावसाठी २० रुपये, सामोसा १५ रुपये, शाकाहारी जेवण ११५ रुपये, विशेष शाकाहारी जेवण १८० रुपये, मांसाहारी जेवण २४० रुपये, बिर्याणी प्लेट १५० रुपये.

 

 

 

 

आईस्क्रिम १० रुपये, मोठा कप २० रुपये, शीतपेय १५ रुपये, लाडू-चिवडा पाकीट ३० रुपये, पोहे २० रपये, डोसा-उत्तप्पा ५० रुपये, मिसळ पाव-भाजीपाव ६० रुपये, साबुदाणा खिचडी-वडा प्लेट २० रुपये असे दर आहे.

 

 

 

 

 

रिक्षा १२०० रुपये, काळी पिवळी टॅक्सी ते जीप, ट्रॅक्स, बोलेरो, टाटा सुमो, लोगान, तवेरा ३ हजार ते ३ हजार ३००, टाटा विक्टा, टाटा इंडिका,

 

 

 

 

इंडिगो, अल्टो ३ हजार रुपये, इनोव्हा झायलो ४ हजार ९०० ते ५ हजार ६१० रुपये, टेम्पो ट्रॅव्हलर (२० प्रवासी) ते बस ४५ प्रवासीपर्यंत वेगवेगळ्या व्यक्ती मर्यादेनुसार ५ हजार ५०० ते १० हजार ४०० रुपये प्रती दिन ठरविण्यात आले आहेत.

 

 

 

 

बुके १०० रुपये, व्हीआयपी बुके ३५० रुपये, फुलांचा हार ३० ते ८० रुपये, सफारी अडीच फूट हार १००० रुपये, मोठा ७ ते ९ फूट हार ५ हजार रुपये,

 

 

 

स्टेज डेकोरेशन (प्रती चौरस फूट) १५० रुपये, फटाक्यांची १ हजारची माळ ७५० रुपये, फॅन्सी फटाके (२५ बार) ११०० रुपये दर ठरविण्यात आला आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *