अजितदादा गटाच्या मोठ्या नेत्याचा मुलगा शरद पवारांच्या राष्ट्र्वादीत प्रवेश करणार
Ajitdada, the son of a senior leader of the group, will join Sharad Pawar's Nationalist Party

राष्ट्रवादी शरद पवार गटाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सध्या सुरु आहे. ही ‘शिवस्वराज्य यात्रा’ आज नाशिकमध्ये आहे. शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत अजित पवार गटाचे
आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागताचे बॅनर गोकुळ झिरवाळ यांनी लावले आहेत.
त्यामुळे गोकुळ झिरवळ राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोकुळ झिरवाळ यांनी बॅनर लावले याचा अर्थ असा की, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाची काही चर्चा झालेली नाही.
तसा संपर्क झालेला नाही. त्यांनी उमेदवारीचा अर्ज केलेला आहे. पण आमच्या पक्षाने अजून उमेदवार ठरवलेला नाही, असं जयंत पाटील म्हणालेत.
गोकुळ झिरवळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
काही दिवसांआधी त्यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली होती. आता आज राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत ते सहभागी झालेत.
जयंत पाटलांच्या स्वागत मिरवणुकीतखासदार भास्कर भगरेंसोबत गोकुळ झिरवळ आहेत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून गोकुळ झिरवाळ निवडणूक लढण्याची चर्चा आहे. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.
राष्ट्रवादी शरग पवार गटाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ आज नाशिकमध्ये आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , अमोल कोल्हे ,
महेबुब शेख, रोहिणी खडसे यांनी आज सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरात जात दर्शन घेतलं. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी नाशिक दौऱ्यावर आहे.
नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात जाण्यापूर्वी त्रंबकेश्वराचे दर्शन घेतलं. शरद पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी देखील त्रंबकेश्वर मंदिरात यावेळी उपस्थित होते.
आता नाशिकमध्ये जयंत पाटील, अमोल कोल्हेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. यात गोकुळ झिरवळ उपस्थित आहेत.