उमेदवारीपूर्वीच शरद पवारांच्या शिलेदाराची निवडणुकीतून माघार ;काय घडले कारण?

Shiledara of Sharad Pawar withdrew from the election even before the nomination; what happened?

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात रावेर मतदारसंघात भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली. रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शरदचंद्र पवार पक्ष एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.

 

 

 

मात्र तब्येत ठीक नसल्याचं कारण एकनाथ खडसेंनी दिलं आहे. डॉक्टरांनी परवानगी दिली तरच निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

 

दरम्यान, यावर उपाय म्हणून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कालच्या बैठकीत जोर धरू लागली आहे. त्यामुळे रोहिणी खडसे की एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

 

 

जळगाव जिल्ह्यात रावेर मतदार संघात भाजपनं विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एकनाथ खडसे उमेदवार राहतील, असं सागितलं जात होतं.

 

 

 

 

मात्र, आपली प्रकृती बरी नसल्याचं कारण देत एकनाथ खडसे यांनी डॉक्टरांनी परवानगी दिली, तरंच आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

 

 

 

त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी पक्षात संभ्रम निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि महिला प्रदेशाध्यक्षआ अध्यक्षा रोहिणी खडसे

 

यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नाशिक येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे.

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, शरद पवार, जयंत पाटील, एकनाथ खडसे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

रोहिणी खडसे यांच्या उमेदवारी बाबत शरद पवार यांच्या कडे मागणी करण्यात आली असली तरी त्यावर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय होऊ शकलेला नाही.

 

 

 

 

मात्र, या सर्व प्रकारात एकनाथ खडसे हे उमेदवार म्हणून राहण्याची शक्यता आता जवळपास नसल्या सारखं मानलं जात आहे.

 

 

 

रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाल्यास नणंद विरुद्ध भावजय असा हा सामना होऊ शकतो. मात्र, अशीही शक्यता कमी असल्याचा अंदाज राजकीय निरीक्षकांचा आहे.

 

 

रावेर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणारच म्हणणारे शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे आता प्रकृतीचे कारण देत बॅकफूटवर गेले आहेत.

 

 

 

खडसेंच्या या तळ्यात-मळ्यात भूमिकेचा फायदा घेत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने आता रावेर मतदारसंघावर दावा केला आहे.

 

 

दुसरीकडे खडसेंनी शरद पवार गटातील चार इच्छुकांची नावे जाहीर केल्याने पक्षात अंतर्गत धुसफूसदेखील वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार व जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांना तातडीने नाशिक येथे बोलावून घेतले आहे.

 

 

 

आघाडीच्या जागावाटपात २०१९ मध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच आमदार खडसे

 

 

 

यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा दाखवत स्वत:ची उमेदवारीदेखील जाहीर केली होती.

 

 

 

त्यामुळे मविआच्या जागावाटपात राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपली हक्काची जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला सोडून रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा घेतली.

 

 

 

 

मात्र, ही जागा घेतल्यानंतर आता खडसेंनी प्रकृतीचे कारण देत वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली.

 

 

 

 

त्यातच खडसेंनी काही इच्छुक उमेदवारांची नावे देखील जाहीर केली. त्यातली अनेक नावे नवीन असल्याने जुने पदाधिकारी दुखावले असून, पक्षात धुसफूस वाढली आहे.

 

 

रावेर मतदारसंघातून आमदार खडसे यांच्यासारखा अनुभवी नेता लोकसभा निवडणूक लढविणार असल्याने आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने या जागेवरील दावा सोडला होता.

 

 

 

 

मात्र, खडसे निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत मिळत असल्याने आता काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी या जागेवर दावा केला असून, वरिष्ठांकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. काँग्रेसकडून आमदार शिरीष चौधरी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

 

 

 

रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी जाणार असल्याची चर्चा असल्यानेच त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी लोकसभेसाठी दंड थोपटले होते.

 

 

 

मात्र, आता पुन्हा रक्षा खडसे यांना संधी देण्याचा निर्णय भाजपच्या गोटात झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच एकनाथ खडसे बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *