पराभवानंतर काँग्रेस नेत्याचा महाविकास आघाडीतील नेत्यांवर गंभीर आरोप
After the defeat, Congress leader makes serious allegations against Maha Vikas Aghadi leaders

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता दीड महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. राज्यात सरकार स्थापन झालं आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे.
काँग्रेस नेते विजय वेडट्टीवार यांनी महाविकास आघाडीत भूकंप घडवणारा खूप मोठा आरोप केला आहे. त्यांनी थेट कोणाच नाव घेतलेलं नाही,
पण आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे. अप्रत्यक्षपणे भाजपला मदत झाल्याच त्यांना सूचित करायच आहे. “नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते तिथे होते.
आम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतो. परंतु जागावाटपाचा तिढा दोन दिवसात सुटला असता, तर 18 दिवस प्रचारासाठी, प्लानिंगसाठी मिळाले असते. आम्ही कुठलही प्लानिंग करु शकलो नाही” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
“आम्हाला निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. ही अनेक कारण झाली. त्यामुळे हे एक मुख्य कारण आहे,
जागा वाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ याचा फटका नक्की बसला” असं विजय वेडट्टीवर म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, जागा वाटपात तुम्हाला काही शंका आहे का?
त्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. कदाचित महाविकास आघाडीत आता यावरुन नव्याने गंभीरस्वरुपाचे आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात.
“मी म्हटलना, हे प्लानिंग आहे का? इतका वेळ वाया घालवला. बैठकीची वेळ 11 वाजताची, यायच दुपारी 2 वाजता. अनेक नेते उशिरा येत होते. त्यात मी कोणाचा नाव घेणार नाही.
यामुळे बैठकांचा वेळ लांबत गेला. एकेका जागेवरुन वारंवार त्याच त्याच गोष्टी होत गेल्या. कदाचित महाराष्ट्रात मविआचा जागा वाटपाचा घोळ दोन दिवसात संपला असता,
तर आम्हाला नक्कीच फायदा झाला असता. 20 दिवस जागावाटपात गेले. वेळ घालवण्यामध्ये षडयंत्र, काही प्लानिंग होतं का? अशी शंका घेण्यास हरकत नाही”
असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत मविआला फक्त 46 जागा मिळाल्या. त्यात काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर समाधान मानावं लागलं.
जागावाटपाची प्रोसेस लांबली गेली त्याची गरज नव्हती. ती का आणि कोणामुळे हे विजय वडेट्टावारांना माहिती असावं. शरद पवार, जयंत पाटील आणि आम्ही शिवसनेचे सगळे होतो.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटप संपलं नव्हतं हे सत्य आहे. कोणत्याही आघाडीमध्ये विलंबाने जागावाटप झाल्यावर एक अस्वस्थता पसरते. कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही.
महायुतीचे जागावाटप अगोदर झाले होते. विजय वडेट्टीवारांची जा वेदाना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्यात त्या स्वीकारल्या पाहिजेत.
काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागावाटप झालं हे आम्हाला आता कळत आहे. आम्ही तेव्हाही सांगत होतो पण आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
काँग्रेसला सर्वात जास्त जागा होत्या पण सर्वात कमी जागा निवडून आल्या. जागावाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे. वडेट्टीवारही जागावाटपामध्येही होते.
विदर्भातील ज्या जागा त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोडल्या असतं तर बरं झालं असतं. ज्या आता ते हरल्या आहेत. चंद्रपूरचे किशोर जोरगेवार यांनी शरद पवार गटाकडून लढायला तयार असल्याचं पत्र दिलं होतं.
शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे वारंवार सांगत होते ती जागा सोडा पण त्यांनी ऐकलं नाही. १७ दिवस त्या जागेवर घोळ घातला, त्यावेळी जोरगेवार हे भाजपमध्ये गेले निवडून आले. अशा अनेक जागा असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.
काही लोकांना वाटत होत आम्हीच जिंकू,आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत. देशातील वातावरण बदललं आहे, पण आमचं म्हणण होतं की आपण एकत्रित जागा लढवू. या सगळेच जबाबदार आहेत.
कोल्हापूर उत्तरची जागा आग्रहाने मागत होतो. शिवसेनेने सहावेळा जिंकली होती. ती जागा आमच्याकडे आले असती तर जिंकलो असतो. कोणाला तरी वाटत होतं की
कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून मुख्यमंत्रिपद हवं होतं. काँग्रेस केंद्रीय समितीने म्हणावा तसा हस्तक्षेप केला नाही, असंही राऊत म्हणाले.