राहुल गांधी चक्क स्मृती इराणी यांच्या बचावासाठी मैदानात

Rahul Gandhi in the field to defend Smriti Irani

 

 

 

 

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यावर असभ्य आणि अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्यांना विरोधीपक्षनेते

 

 

 

आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधींनी वॉर्निंग दिली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना सल्ला देताना राहुल गांधी म्हणाले की, “असभ्य भाषेत

 

 

अजिबात कमेंट करू नका. आयुष्यात विजय-पराजय असतो, परंतु एखाद्याचा अपमान करणे हे ताकदीचे नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे.”

 

 

रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अश्लील भाषेत वक्तव्य आणि कॉमेंट करु नका अशी वॉर्निंग दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसचा कोणताही नेता स्मृती इराणी यांना वाईट बोलणार नाही,

 

 

 

अपशब्द वापरणार नाही. राहुल गांधी यांनी ट्वीटरवर (एक्स) पोस्ट करत काँग्रेस नेत्यांना सल्ला दिलाय. ते म्हणाले की, “आयुष्यात विजय-पराजय येतच असतो. सर्वांना विनंती आहे,

 

 

 

की कुणीही स्मृती इराणी अथवा अन्य कोणत्याही नेत्याविरोधात आपत्तीजनक, असभ्य भाषेचा वापर करु नये. एखाद्याचा अपमान करणं, हे ताकदीचं नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे.”

 

 

 

 

राहुल गांधींनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर यूजर्स आणि त्यांच्या समर्थकांनी कमेंट केल्या. एका यूजरने लिहिले की, ‘ओके सर, पण हे लोक तुमच्या

 

 

आणि आमच्याबद्दल जास्त भयानक गोष्टी बोलत होते. तरीही तुम्ही बोललात हे बरे झाले.’ आणखी एका यूजरने लिहिले की, राहुल गांधीजी बरोबर बोलले.

 

 

 

एखाद्या स्त्रीबद्दल बोलताना सावधगिरी बाळगावी, राजकीय मतभेद कोणाची तरी बदनामी किंवा मानहानी करण्यास परवानगी देत ​​नाहीत. नैतिक मूल्ये जपताना राजकीय मतभेदांवर नेहमीच टीका केली पाहिजे.

 

 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीमधून पराभवाचा धक्का बसला होता. लोकसभेत पराभवाचा झटका बसल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले.

 

 

अमेठीमधून काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी स्मृती इराणींचा दारुण पराभव केला होता. याआधी 2019 लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता.

 

 

आता स्मृती इराणींचा पराभव झाला. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना काँग्रेस नेत्यांकडून ट्रोल करण्यात येत आहे. त्याशिवाय बंगला खाली करण्यासंदर्भातही मागणी केली जात आहे.

 

 

त्यामुळेच राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या कार्यकर्त्यांना खालच्या भाषेत कॉमेंट करु नका, असं सांगितलेय.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *