ज्येष्ठ नेते सिताराम येच्युरी यांचे निधन

Senior leader Sitaram Yechury passed away

 

 

 

ज्येष्ठ माकप नेते सिताराम येच्युरी यांचे निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिनाभरापासून सिताराम येच्युरी यांच्यावर उपचार सुरु होते.

 

त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात होते.

 

सिताराम येच्युरी यांचा मूळचा जन्म मद्रासमधील आहे. आयुष्यभर त्यांनी कम्युनिष्ट पक्षाचं काम जोमाने केलं. विशेष म्हणजे भारतात कम्युनिष्ट पक्षाच्या वाढीचा आणि पक्षाला उतरती कळा लागण्याचा काळही येच्युरी यांनी पाहिलेला आहे.

 

सध्याच्या काळाच्या त्यांनी केरळमधील सरकारमध्येही महत्वाची भूमिका बजावली होती. सिताराम येच्युरी यांच्या जाण्याने कम्युनिष्ट पक्षाने बुद्धीवादी चेहरा गमावलाय.

 

सिताराम येच्युरी यांना 19 ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते लाईफ सपोर्ट सिस्टमवर होते. मागील काही दिवसांत त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती.

 

मात्र, त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची टीम सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेऊन होती. मात्र, अखेरीस आज त्यांची शेवटचा श्वास घेतलाय.

 

 

सीताराम येच्युरी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. सिताराम येच्युरींनी कॉलेज जीवनापासून राजकारणात सहभाग नोंदवत होते.

 

आणिबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात झाली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दोन्ही सरकारमध्ये ते सत्तेत सहभागी झाले होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *