शरद पवार गटाचे कोणते निवडणूक चिन्ह ?
Which election symbol of Sharad Pawar group?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांचंच असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाचा निकाल शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
या निकालानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह शरद पवार गटाला वापरता येणार नाही. नवीन नाव आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाला निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे.
नवीन नाव आणि चिन्ह याबाबत शरद पवार गटाला आज संध्याकाळपर्यंत कळवायचं आहे. शरद पवार गटाने आपलं नाव आणि चिन्ह ठरवलं असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘मी राष्ट्रवादी पार्टी’ हे नाव आणि ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह मिळावं अशी मागणी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात केली जाऊ शकते.
शरद पवार गटाने चार चिन्ह निश्चित केल्याची देखील माहिती मिळत आहे.शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार असल्याचं ट्वीट निवडणूक आयोगाच्या निकालानंतर केलं आहे.
येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ३ नावे आणि ३ चिन्हे सादर करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला केल्या आहेत.
आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ही नावे आणि चिन्ह सादर करावी लागणार आहे. आज दिलेल्या वेळेत नाव आणि चिन्हांची यादी शरद पवार गटाने सादर न केल्यास त्यांना अपक्ष म्हणून मान्यता मिळेल.
निवडणूक आयोगाने अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवारांनाच राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह वापरता येणार आहे. शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे.
शरद पवार गटाने याबाबत निवडणूक आयोगाला माहिती न कळवल्यास त्यांना अपक्ष म्हणून मान्यता देण्यात येईल, असं त्यांना सांगण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. यातच चार चिन्ह शरद पवार गटाने निवडली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार गट उद्या नवीन पक्ष चिन्ह निवडू शकतो. यातच त्यांच्याकडे चार पर्याय आहे. ज्यातील दोन पर्यायांबद्दल सूत्रांनी दिली आहे.
शरद पवार गटाकडे उगवता सूर्य आणि चष्मा हे दोन चिन्ह निवडण्याचा पर्याय आहे. आता उद्या ते कोणते चिन्ह निवडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांनाच नाव आणि चिन्ह वापरता येईल. शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्यातील ४१, नागालँडमधील ७ आमदार अजित पवारांकडे आहेत. तर लोकसभेचे दोन खासदार अजित पवारांकडे आहेत.
एका खासदाराने आणि महाराष्ट्रातील पाच आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिले आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने नवे चिन्ह आणि पक्षाचे नाव सुचवावे लागणार आहे.
उद्या ७ फेब्रुवारीला दुपारी ४ पर्यंत हे पर्याय द्यावेत, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. हे पर्याय वेळेत न दिल्यास शरद पवार गटाला अपक्ष म्हणून मान्यता मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने न झाल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे.