रासपचे महादेव जाणकर परभणी ऐवजी “या” मतदारसंघातून निवडणूक लढवणार

RSP's Mahadev Janakar will contest from this constituency instead of Parbhani

 

 

 

 

 

लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापू लागले असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.

 

 

बारामतीत रासपच्या शनिवारी (ता. 10) झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूकीत एकमताने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचे निश्चित झाले.

 

 

पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या सूचनेनुसार बूथ तेथे कार्यकर्ता हे अभियान राबविण्यात येणार आहे. बूथनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कामाचे नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.

 

 

मतदारांशी संपर्क साधण्यासाठी सर्व प्रकारच्या माध्यमांचा वापर करणे, बूथ समिती स्थापन करणे, रासपचे विचार मतदारांपर्यंत पोहोचविणे, पक्षाची ध्येयधोरणे लोकांना समजून सांगणे अशा बाबी याबैठकीत ठरविल्या गेल्या.

 

 

 

आपण परभणी लोसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा यापूर्वी जाणकारांनी केली होती मात्र महादेव जानकर आता माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

 

 

 

त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी 17 फेब्रुवारी रोजी फलटण येथे बारामती तालुक्यातून शंभर चार चाकी वाहने कार्यकर्त्यांसह जाणार असल्याची माहिती रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांनी दिली.

 

 

महादेव जानकर यांना विजयी करण्यासाठी बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यातूनही रासपचे कार्यकर्ते जिवाचे रान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

या बैठकीस जिल्हा नियोजन समिती सदस्य तानाजी शिंगाडे, किरण गोफणे, बारामती तालुकाध्यक्ष अॅड. अमोल सातकर, विठ्ठल देवकाते, शैलेश थोरात,

 

 

 

दादा भिसे, महादेव कोकरे, काका बुरूंगले, अॅड. दिलीप धायगुडे, लखन कोळेकर, विजय मोटे, नवनाथ मलगुंडे, दशरथ आटोळे, प्रमोद धायगुडे, अनिवाश मासाळ,शाम घाडगे, किशोर सातकर, प्रकाश देवकाते उपस्थित होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *