भाजप प्रवेशानंतर ईडी बाबत काय म्हणाले अशोक चव्हाण?
What did Ashok Chavan say about ED after joining BJP?

काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपपध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती.
अखेर अपेक्षेप्रमाणे त्यांनी आज भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय, आपला वैयक्तिक निर्णय असून काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर टीका किंवा आरोप करण्याचं त्यांनी टाळलं आहे.
काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. त्यासाठी खूप विचार केला. काही गोष्टी चांगल्या होत आहेत तर त्यात आपला पण वाटा हवा ही भावना आहे.
काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिलं तसच मी पण पक्षासाठी खुप काही योगदान दिलं आहे. अचानक माझ्यावर काही आरोप करत असेल तर ते बरोबर नसल्याचं ते म्हणाले.
सभागृहाच्या बाहेर आदर बाळगला. ती परंपरा कायम महाराष्ट्रात रहावी. जी काही पक्षाची धोरणा आहे आणि पक्ष जे आदेश देतील त्या प्रमाणे मी काम करेन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता.
मला कोणीही जा म्हटलं नाही. जिथे होतो तिथे मी शेवटच्या क्षणापर्यंत काम केलं आहे. त्यामुळे आज तरी मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही. आम्ही सर्वांनी विकासासाठी एकमेकांना साथ दिली.
आज मी माझ्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. गेल्या ३८ वर्षांच्या राजकीय प्रवासात हा एक नवा बदल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांची प्रेरणा घेऊन पुढे वाटचाल करता याची. देशाच्या प्रगतीत आपला वाटा असावा या प्रमाणिक भूमिकेतून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं ते म्हणाले.
काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज अखेर त्यांनी भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला.
भाजपमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते चुकून मुंबई काँग्रेस बोलून गेले. त्यामुळे सभागृहात एक हशा पिकला.
त्यावर त्यांनी पक्षप्रवेशानंतर पहिलीच पत्रकार परिषद आहे, त्यामुळे चुकून काँग्रेसचं नाव आलं, अशी सारवासारव केली. दरम्यान काँग्रेसच नाव चुकून आलं तरी याची राज्यभर चांगलीच चर्चा रंगली आहे.