शरद पवार यांनी OBC सर्टिफिकेट घेतलं की नाही? जातीचा दाखला व्हायरल

Has Sharad Pawar taken OBC certificate or not? Caste certificate viral ​

 

 

 

सध्या सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कथित जातीचा दाखला व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शरद पवारांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा केला जात आहे.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा जातीचा दाखला सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या जातीच्या दाखल्यावरून अनेक चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

 

अशातच हा दाखला खरा की खोटा? असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर शरद पवार समर्थक विकास पासलकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित जातीचा दाखला खोटा असल्याचा दावा पासलकर यांनी केला.

 

 

 

शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलं नसल्याचंही पासलकर यांनी सांगितलं. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या शरद पवारांच्या कथित जातीच्या दाखल्यावर भाष्य करताना विकास पासलकर म्हणाले, “एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जातंय.

 

 

 

हे षडयंत्र अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रातील जे षडयंत्रकारी लोक आहेत, त्यांना कुठून तरी रसद पुरवली जात आहे. शरद पवारांचं बारामतीमध्ये शिक्षण झालं आहे, याचा धडधडीत पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे हे सर्व षडयंत्राचा भाग आहे.”

 

 

 

 

“मागील कित्येक वर्षांपासून शरद पवारांविरोधात षडयंत्र सुरू आहे. परंतु जेव्हा सामाजिक विषय असतो. तेव्हा आम्हाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन अशा विषयांमध्ये खोलात जावं लागतं.

 

 

 

एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी व्हिटामिन कुठून पुरवलं जातंय, हे शोधणं गरजेचं आहे, हे सगळं नागपूर सेंटरकडून घडत आहे,” असा दावा पासलकर यांनी केला

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *