शरद पवार महाले ‘लोकसभेच्या ‘त्या’ 27 जागांबद्दल अफवा
Sharad Pawar Mahal Rumors about 'those' 27 Lok Sabha seats

राज्यात आगामी लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. यादरम्यान महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत.
यादरम्यान वंचित बहुजन आघाडीने 27 जागांवर मागणी केल्याची बातमी निव्वळ अफवा असून त्यांनी केवळ सहा जागांची मागणी केल्याची माहिती जेष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामतीत पत्रकारांशी अनोपचारिक संवाद साधताना दिली.
वंचित सोबत आघाडी व्हावी यासाठी स्वतः मी आग्रही असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. वंचितने जास्त जागा मागितल्या
याबाबत कार्यकर्ते व माध्यमांचाही गैरसमज झाल्याचे पवार म्हणाले. वंचित आघाडीची एक स्वतःची व्होट बँक असून ती महत्त्वाची असल्याचे पवार यांनी नमूद केले.
दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघ महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्याबाबतही शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले असून, धनगर समाजासाठी एक जागा सोडण्याची महाविकास आघाडीची भूमिका असल्याचेही त्यांनी
या अनौपचारिक संवादात नमूद केले. महाविकास आघाडीची उद्या (ता. 4) बैठक होणार असून उद्धव ठाकरेंसह अनेक प्रमुख नेते या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
बारामतीत विद्या प्रतिष्ठान मध्ये नमो महारोजगार मेळावा दहावीच्या परीक्षेच्या वेळेस घेणे हे अयोग्य होते, यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, असे ते म्हणाले.
दहावीच्या परीक्षेचे केंद्र बदलणार असे सांगितले गेले, प्रत्यक्षात ते केंद्र बदलले गेले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.
या नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने हाउसकीपिंग सारख्या काही नोकऱ्या देऊन युवकांची फसवणूकच झाली असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान या मेळाव्याच्या प्रोटोकॉल मध्ये आपलं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांनी आज बारामतीत पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना, केवळ गप्पा मारू असे सांगत पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. या संवादा दरम्यान त्यांनी अनेक विषयांवर पत्रकारांशी जवळपास अर्धा तास चर्चा केली.