ठाकरे गटाच्या माजी आमदारांवर निलंबनाची कारवाई

Suspension action against former MLAs of Thackeray group

 

 

 

 

अहमदनगर दक्षिणमध्ये प्रामुख्याने महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यामध्ये ही लढत होत असून ही लढत सध्या महाराष्ट्रमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

 

 

 

निवडणूक जशी जवळ येऊ लागली तशी उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी अनेक अनेक संघटना पुढे येऊ लागल्या आहेत. त्यातच काल महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना

 

 

 

 

 

पारनेर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी यांनी पाठिंबा दर्शविला. त्यामुळे विधानसभेचे माजी उपसभापती

 

 

 

 

 

आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. अहमदनगरच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.

 

 

 

एकंदरीतच पारनेरच्या महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. तर लंकेच्या बालेकिल्ल्यांमध्ये सुरूंग लागल्याचे देखील पाहायला मिळालं.

 

 

 

 

परंतु आज दुपारी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत पारनेर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आणि शिवसेना पदाधिकारी यांची एक बैठक पार पडली.

 

 

 

 

या बैठकीमध्ये एकमताने निर्णय झाला तो म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनाच पाठिंबा देण्याचा. खरंतर विजय औटी यांच्यासोबत असलेल्या

 

 

 

पारनेर शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पठारे, युवा सेना अनिल शेटे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारे, यांनी लंके यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

 

 

 

२०१९ निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवसेना कार्यकर्त्यांना त्रास देण्यात आला होता. मात्र आज झालेल्या बैठकीमध्ये लंके यांनी आश्वासन दिलं की यापुढे आपण एकमेकांना सहकार्य करून काम करू.

 

 

 

त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत असून विखे यांना देण्यात आलेला पाठींबा हा विजय औटी यांचा वयक्तिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी

 

 

 

 

माजी आमदार विजय औटी यांनी पक्षाचा आदेश पाळला नसल्याने त्यांच्यावर पक्षभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती.

 

 

 

 

 

त्यानुसार आज त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. निवडणूक काळात पक्षविरोधी भूमिकेमुळे निलंबित होणारे हे पहिलेच माजी आमदार आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *