शिंदे,अजितदादांची अमित शहांसोबत बंद खोलीत बैठक ;काय मिळाले आश्वासन?

Shinde, Ajitdad's closed room meeting with Amit Shah; What assurances were received?

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या तयारीत भारतीय जनता पक्षानं देशपातळीवर आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगानं तारखांची घोषणा करण्यापूर्वीच भाजपनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

 

 

 

त्यात १९५ उमेदवारांचा समावेश आहे. पण यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत आहे.

 

 

 

शिवसेना आणि राष्ट्रवादीनं भाजपकडे अनुक्रमे २२ आणि १० जागांची मागणी केली. पण मित्रपक्षांना इतक्या जागा सोडण्याची भाजपची तयारी नाही.

 

 

 

शिंदेंच्या शिवसेनेनं आधी २२ आणि मग १८ जागांचा आग्रह धरला. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतली.

 

 

 

 

माझ्यासोबत असलेल्या १३ खासदारांना संधी मिळावी, अशी भूमिका त्यांनी घेतली. पण भाजप शिंदेंना १३ जागा सोडण्याच्या तयारीत नाही.

 

 

 

भाजपनं शिंदेंना १० जागांचा प्रस्ताव दिला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर बंद दाराआड झालेल्या बैठकीत शहांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा केली.

 

 

 

राष्ट्रवादी लोकसभेच्या ८ जागा जिंकेल असा विश्वास अजित पवारांना आहे. भाजपकडे असलेल्या गडचिरोली मतदारसंघात मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना निवडून आणण्याचा विश्वास अजित पवारांना आहे.

 

 

 

पण हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची भाजपची तयारी नाही. शिंदेंना १०, अजित पवारांना ६ जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे. उर्वरित ३२ जागा लढवण्याचा भाजपचा मानस आहे.

 

 

शिवसेनेच्या परभणी, नाशिक, औरंगाबाद, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपनं दावा केला आहे. मुंबईत शिंदेंना दोन जागा हव्या आहेत

 

 

 

तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला ठाणे मतदारसंघ भाजपला हवा आहे. काल बंददाराआड झालेल्या बैठकीत अमित शहांनी शिंदे आणि अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत जागावाटपात थोडी तडजोड करण्यास सांगितलं.

 

 

 

लोकसभेला थोडं समजून घ्या. या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीत नुकसान भरपाई करुन देतो, असा शब्द शहांनी दिल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं दिलं होतं.

 

 

 

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी मातोश्री बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.

 

 

 

मातोश्रीवरील खोलीत बंद दाराआड चर्चा करतेवेळी अमित शहांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता, असा दावा ठाकरेंनी केला होता.

 

 

 

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंनी सत्तेत समान वाटा याचा उल्लेख वारंवार केला. पण मुख्यमंत्रिपदाच्या समान वाटपाबद्दल ठाकरेंना कोणताही शब्द देण्यात आलेला नव्हता,

 

 

 

असं भाजपकडून सांगण्यात आलं. यानंतर ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आणि भाजपला सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी बाकांवर बसावं लागलं.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *