महायुतीत जागावाटपाचा पेच वाढला;अजित पवारांनी केली शिंदेएवढ्याच जागांची मागणी

The embarrassment of seat distribution in the Grand Alliance increased; Ajit Pawar demanded the same number of seats as Shinde

 

 

 

 

एकनाथ शिंदे यांच्या गटाला जितक्या जागा मिळतील, तितक्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मिळाव्यात, अशी भूमिका दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी घेतली आहे.

 

 

 

मुंबईतील बीकेसी येथील रिलायन्स जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अजित पवार, प्रफुल पटेल,

 

 

सुनील तटकरे यांची जागावाटपावर बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत भुजबळांनी सांगितलेल्या फॉर्म्युलामुळे महायुतीतील पेच वाढला आहे.

 

 

 

जागावाटपाच्या चर्चा अजूनही सुरु आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून आमचा अभ्यास सुरुच होता. मात्र नंतरही आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचं काम केलं आहे.

 

 

 

जागावाटपाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करु. आमच्या डोळ्यासमोर काही जण आहेतच, पण जागावाटपानंतर अधिक जोमाने कामाला सुरुवात करु.

 

 

 

पण आम्ही बैठकीत एवढंच सांगितलं आहे की शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तितक्याच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या पाहिजेत, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

 

 

शेवटी सगळी मंडळी एकत्रित बसून निर्णय घेतील, मग जो होईल तो सर्वांना मान्य असेल. मला विश्वास आहे की आम्हाला दिलेल्या कमिटमेंट, आश्वासनं पाळली जातील.

 

 

 

पण त्यापेक्षाही कोण उमेदवार तिथे मजबूतीने लढू शकतो आणि जिंकून येऊ शकतो हे महत्त्वाचं आहे, नंतर तो कुठल्या पक्षाचा हे महत्त्वाचं… प्रत्येकाचे उमेदवार पाहून त्यातून कोण निश्चित निवडून येईल हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा निकष आहे, असंही भुजबळ म्हणाले.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न जे आहे.. देशात ४०० पार, महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त कशा पद्धतीने जिंकून येऊ, त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. कालपासून अमित शाहही या चर्चेत आहेत.

 

 

 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय लवकरच होईल. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, यात काही शंका नाही. सर्वात जास्त आमदार खासदार त्यांचेच आहेत.

 

 

 

आमची चर्चा सुरु आहे, सामोपचाराने निर्णय होईल. जागावाटपात राष्ट्रवादी नाराज असल्याच्या चर्चा तथ्यहीन आहेत. चर्चा आताच सुरु झाल्यात,

 

 

 

आधीच कसे नाराज होऊ? राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, तिथे लढण्याचा आमचा आग्रह आहे. जी जागा आम्हाला मिळेल, आम्ही तिथे जिंकून येऊ, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.

 

 

 

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४८ पैकी २५ जागा लढवल्या होत्या, तर शिवसेनेने २३ जागांवर समाधान मानले होते. भाजपने त्यापैकी २३ जागा जिंकल्या,

 

 

तर शिवसेनेने १८. यापैकी १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. यंदा भाजपची बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे. त्यामुळे भाजप ३० जागांवर लढण्यावर ठाम असल्याचे बोलले जाते.

 

 

 

शिवसेना यंदाही २२ जागांसाठी अडून बसली होती, परंतु भाजपकडून दबाव वाढत असल्याचं बोललं जातं.

 

 

एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षातील सर्व १३ विद्यमान खासदारांना तिकीट मिळावेत यासाठी आग्रही होते. परंतु शहा यांनी त्यांना प्रत्येक मतदारसंघाची

 

 

 

ग्राऊण्ड रिअॅलिटी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे १३ पैकी काही विद्यमान खासदारांची तिकिटं कापली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या होत्या. अजित पवार यांच्या नेतृत्वात त्यापैकी केवळ सुनील तटकरे हे एकमेव खासदार सत्तेत सहभागी झाले आहेत.

 

 

राष्ट्रवादी दहा जागांवर इच्छुक असून भाजपही ३२ जागांवर ठाम आहे. त्यामुळे उर्वरित १६ जागांचे समसमान वाटप करायचे झाल्यास शिवसेना-राष्ट्रवादीला प्रत्येकी ८-८ जागा मिळू शकतात.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *