मराठा आंदोलकांच्या “या” निर्णयामुळे भुजबळांची जरांगेवर टीका,म्हणाले……
Bhujbal's criticism of Jarang because of "this" decision of Maratha protesters, said...

राज्याचे अन्य व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलकांना लक्ष्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत भुजबळ यांनी हे विधान केले आहे.
आगामी लोकसभा निवडणूक मतदान यंत्रावरून बॅलेट पेपरवर आणण्यासाठी मराठा आंदोलक प्रयत्नशील आहेत. या संदर्भात मराठा आरक्षण आंदोलनातील विविध कार्यकर्ते
आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करावेत. त्यामुळे मतदान यंत्राऐवजी मतदान पत्रिकेवर घ्यावे लागेल, असा हा प्रयत्न आहे. त्यावर भुजबळ यांनी जरांगे पाटील यांचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली.
लोकसभा निवडणुका ही लोकशाहीची महत्त्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत बाधा येईल असे काम मराठा आंदोलकांनी करू नये. त्याचा लोकशाही प्रक्रियेवर विपरीत परिणाम होईल.
कारण त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतील. हा फक्त मतदान यंत्राचा प्रश्न नाही. त्यात अनेक गंभीर विषय आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करणे हा एवढा सोपा विषय राहिलेला नाही.
मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक प्रत्येक मतदारसंघात पाचशेहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करतील असे बोलले जाते. असे घडल्यास तेवढ्या उमेदवारांना अर्ज भरणे हे सोपे नाही.
त्यासाठी तेवढे वकील देखील लागतील या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम भरण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च येईल. हा खर्च कोण करेल हे कितपत योग्य आहे.
हे मला सांगता येणार नाही. मात्र असे करणे म्हणजे आपल्या मागणीसाठी लोकशाही व निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळा आणणे हे आहे, असे भुजबळ म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील आणि भुजबळ हे सातत्याने एकमेकांवर टीका करीत असतात. विशेषतः भुजबळ यांनी यापूर्वी केलेल्या टीकेमुळे
ते मराठा आंदोलकांच्या रडारवर आलेले आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा त्यांनी जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना टीका करून वाचण्याचा प्रयत्न केला आहे.