महायुतीत धुसफूस;शिवसेना उमेदवाराने सांगितले “मला निवडणुकीत राष्ट्रवादीने मदत केली नाही”

Shiv Sena candidate says NCP did not help me in election

 

 

 

 

 

महाराष्ट्रातलं लोकसभा निवडणुकीचं मतदान संपलं आहे. राज्यात पाच टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा थेट सामना रंगला.

 

 

 

मतदानानंतर आता महायुतीमधली धुसफूस समोर आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले आहेत.

 

 

 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझा प्रचार केला असता तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिटही राहिलं नसतं, असं श्रीरंग बारणे म्हणाले आहेत.

 

 

 

‘मावळ लोकसभा मतदारसंघात आपण अडीच लाखांचं लीड घेऊन विजयी होऊच, पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनापासून

 

 

 

आपला प्रचार केला असता तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असतं,’ असं म्हणत श्रीरंग बारणेंनी त्यांची नाराजी बोलून दाखवली.

 

 

 

‘अजित पवार आणि पार्थ पवार यांनी सांगितल्यानंतर आमदार आणि नेत्यांनी आपला प्रचार केला, मात्र ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही, त्यांच्याबद्दल आपण अजित पवारांना कळवलं आहे,’ असं बारणे म्हणाले.

 

 

 

निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर श्रीरंग बारणे यांनी असं वक्तव्य केल्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघामधील महायुतीतील

 

 

 

अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. श्रीरंग बारणेंच्या आरोपाला राष्ट्रवादीचे नेते काय उत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

 

 

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली.

 

 

 

मावळ मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 13 मे रोजी निवडणूक पार पडली. या मतदारसंघात सरासरी 52.90 टक्के मतदान झालं. आता 4 जूनला लागणाऱ्या निकालात कुणाचा विजय होतो, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *