पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात; ‘या’ उमेदवारानं भरला पहिला अर्ज

Filing of candidature application for first phase starts from today; First application form filled by 'Ya' candidate

 

 

 

 

 

लोकसभा निडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

 

 

 

२१ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातील सर्वाधिक १०२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघांचाही समावेश आहे.

 

 

 

पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली, गोवा,

 

 

 

गुजरात, हिमाचल प्रदेश, हरयाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये पहिल्या आणि एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

 

 

 

 

या सर्व राज्यांमध्ये मिळून १०२ मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मदान होणार आहे.

 

 

 

 

 

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये हे मतदान होणार आहे.

 

 

 

 

पहिल्या टप्प्यासाठी आज २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. तर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २७ मार्च आहे. त्यानंतर उरलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी

 

 

 

२८ मार्च रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. तर निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

 

 

लोकसभा निवडणुकीचं बिगुल आता वाजलं आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. याार्श्वभूमीवर आजच्या पहिल्याच दिवशी एका उमेदवारानं राज्यातून पहिला अर्ज भरला आहे.

 

 

 

 

 

व्यंकटेश्वर स्वामी यांनी नागपूरमधून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून पहिला अर्ज भरला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.

 

 

 

 

या ठिकाणी भाजपनं नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली आहे.याच व्यंकटेश्वर स्वामी यांनी आपण सोलापुरातून राखीव मतदारसंघातूनही लोकसभा उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याचं माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं.

 

 

 

 

मी सोलापुरातून राखीव जागेतून लोकसभा मतदारसंघातून लढणार आहे, असंही यावेळी व्यंकटेश्वर स्वामी यांनी सांगितलं.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *