अजितदादा गटाचा आमदार शरद पवारांच्या तंबूत ? ; राजकीय चर्चांना उधाण

MLA of Ajitdada group in Sharad Pawar's tent; An invitation to political discussions

 

 

 

अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांनी बारामती (जि. पुणे) येथील गोविंदबाग इथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आपल्या कार्यकर्त्यांसोबत भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला मोठे उधाण आले आहे.

 

 

 

ही भेट खासगी व दिवाळीनिमित्त घेतली असल्याचे सांगण्यात आले असले तरी, अजित पवार गटाचे आमदार पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

 

 

 

आमदार पाटील यांनी बुधवारी शरद पवार यांची सुमारे पाऊण तास विधानसभेच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली.

 

 

 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, मुंबई बाजार समितीचे बाळासाहेब सोळसकर व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षातून शरद पवार व अजित पवार गट यांनी आपली वेगळी चूल मांडली.

 

 

 

त्यावेळी शरद पवार प्रथमच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, जिल्ह्याच्या सीमेवर शिंदेवाडी – शिरवळ येथून शरद पवार यांच्या गाडीत बसून आमदार पाटील यांनी प्रवास केला होता.

 

 

 

यावेळी ही मोठी चर्चा घडली होती. यानतंर आज ही दिवाळीच्या मोक्यावर शरद पवार यांची पाटील यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा घडून आल्याने, वाई – खंडाळा – महाबळेश्वर या विधानसभासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *