मनसेच्या महायुतीत इंट्रीने पक्षांतर्गत रुसवे-फुगवे

The entry of the MNS into the grand alliance has caused confusion within the party

 

 

 

 

 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार निश्चित नसताना देखील महायुतीतील घटक पक्षांकडून जोरदार रस्सीखेच सुरू दिसते.

 

 

 

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा येथे खासदार आहे. भाजपने मात्र या मतदारसंघावर दावा केला आहे. यातच महायुतीत भाजपने मनसेला आमंत्रण दिल्याने या जागेबाबत आणखीच संभ्रम निर्माण झाला आहे.

 

 

 

काही दिवसातच ही जागा महायुतीकडून कोण लढणार याचा फैसला होईल. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मनसेला ही जागा जाणार असल्याची चर्चेने जार पकडलाय. त्यामुळे ही जागा महायुतीत कोणाकडे? याची राजकीय चर्चा रंगली आहे.

 

 

 

 

भाजप आणि शिवसेना युती असताना ही जागा शिवसेनेकडे होती. या मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेचा खासदार

 

 

 

सलग दोन वेळा निवडून आला आहे. शिवसेना फुटल्यानंतर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले.

 

 

 

आता २०२४ च्या निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडे ही जागा आहे. परंतु महायुतीत असलेले रिपाई आठवले गटाने या जागेवर दावा सुरू केला आहे.

 

 

 

 

इतर समाज घटकांनी देखील उमेदवारीची मागणी केली आहे. रिपाई आठवले गटाने राजकीय दबाव वाढवला आहे. राज्यसभा

 

 

 

आदला-बदली करण्याची मागणी आठवले गटाकडून महायुतीकडे करण्यात आली आहे. यावर भाजपने अजून मौन धरले आहे.

 

 

 

 

 

महायुतीत येण्याच्या संभाव्य चर्चेने मनसे हा देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी तयारीत आहे. मनसेला राज्यात तीन जागा हव्या आहेत. या शिर्डीचा देखील समावेश असल्याचे सांगितले जाते.

 

 

 

 

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे निष्ठावंत सहकारी बाळा नांदगावकर यांनी शिर्डीतून उमेदवारी मिळू शकते. तसे बाळा नांदगावकर यांनी

 

 

 

राज ठाकरे यांनी सांगितले, तर नंदूरबारमधून लढ, तर त्याची देखील तयारी असल्याचे संकेत दिलेत. बाळा नांदगावकर यांचा शिर्डी चांगला संपर्क आहे.

 

 

 

शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांचा पराभव करणारे बाळा नांदगावकर राज्यात राजकीय चर्चेत असतात.

 

 

 

मनसेची एन्ट्री शिर्डीत झाल्यास, महायुतीकडून मनसे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना अशी अटीतटीची लढत रंगतदार होईल.

 

 

 

 

महायुतीत असलेला भाजपने राज्यातील पहिल्या यादीत २० उमेदवार जाहीर करून कामाला लागले आहे. राज्यात तरी भाजपने प्रचारात वेग पकडलेला दिसतो.

 

 

 

 

मात्र भाजपने महायुतीत इतर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा गट, रिपाई आठवले गट, मनसेसह इतर सहकारी पक्षांना चर्चेत अडकवून ठेवले आहे.

 

 

 

 

भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा महायुतीमधील इतर घटक पक्षांचा विरोध दूर करण्याची यशस्वी खेळी केल्याचे दिसते.

 

 

 

महायुतीत मनसेला घेऊन रिपाई आठवले गटाला शह देण्याची देखील भापजची राजकीय खेळी दिसते. मनसेला ही जागा गेली तर शिवसेना शिंदे गटाला नगर जिल्ह्यातील हक्काच्या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे.

 

 

 

 

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे. अनुसूचित जातीतील विविध जात समूहांनीही शिर्डीत आपल्याला प्रतिनिधीत्व मिळण्याची मागणी करीत खळबळ उडवून दिली आहे.

 

 

 

रिपब्लिकन जनतेत बौद्ध, चर्मकार, मातंग उमेदवारीवर घमासान सुरू आहे. एकमेकांवर दोषारोप व मतदान बहिष्काराचे इशारेही सुरू असल्याने नगर दक्षिण थंड व शिर्डी मात्र राजकीय वातावरण गरम, अशी स्थिती झाली आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *