मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
A case has been registered against Manoj Jarange Patil
सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगे यांच्यावर गुन्हा नोंद केलाय. मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी रास्ता रोको केल्याप्रकरणी
मराठवाड्याचा विचार करता तब्बल १०४१ जणांवर तर बीड जिल्ह्यातल्या ४२५ जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वत: मनोज जरांगे यांच्यावर शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आतापर्यंत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, असे वारंवार आवाहन केलेल्या जरांगे यांच्यावर गुन्ह्याची नोंद झालीये.
राज्य सरकार सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी गावोगावी रास्ता रोको करण्याचे आवाहन मराठा बांधवांना केले.
तसा कार्यक्रमही त्यांनी मराठा समाजबांधवांना दिला. जरांगे यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील विविध ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर विना परवानगी रास्ता रोको करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी जरांगे यांच्यासहित त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे-पाटील उपोषण मंडपातून अचानक उठून चला मी मुंबईत फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर चालत चाललोय अशी घोषणा देत निघताच सभामंडपात प्रचंड गोंधळ उडाला.
तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. मराठा समाजातील अनेक आंदोलक जरांगे-पाटील यांना त्यांच्या निर्णयावर फेरविचार करण्यास विनवत होते. रस्त्यावर महिलांसह मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी त्यांच्या सोबत चालण्यास सुरुवात केली.
त्यामुळे जरांगे यांच्या गाडी समोर मोठे अडथळे निर्माण झाले. सायंकाळपर्यंत हा ताफा भांबेरी ता. अंबड येथे पोहोचल्यावर तेथील नागरिकांनी जरांगे-पाटील यांना थांबवले.
रात्रीचा मुक्काम करून औषधोपचार घेण्याची विनंती केली. भांबेरी गावांतील गावकरी जरांगे-पाटील यांना चहूबाजूंनी गराडा घालून बसले.
दरम्यान या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अक्षयकुमार बंन्सल भांबेरीत मुक्कामी थांबले आहेत.