मतं मागायला आलेल्या भाजप मंत्र्यांना मतदारांनी विचारला कामाचा हिशोब; मंत्री भडकले अन् ….. .
Voters asked the BJP Ministers who came to seek votes to account for their work; The minister got angry and ... .
मध्यप्रदेश निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेत्यांकडून आपल्या कार्यक्षेत्रात जोरदार प्रचार करण्यात येत आहे.
याचदरम्यान, मध्यप्रदेशचे कृषीमंत्री कमल पटेल यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत
मतदार भाजप नेत्याला विकासकामांचा हिशोब मागताना दिसत आहेत. मतदारांच्या या पवित्र्यानंतर मंत्री पटेल नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेसला मत द्या असे मतदारांना सुनावले
सोशल मिडियात व्हायरल होणारा व्हिडिओ हरदा या मतदारसंघातील आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे या बाबत माहिती समोर आलेली नाही.
या व्हिडिओत मंत्री पटेल ग्रामीण भागात प्रचार करताना दिसून येत आहेत. याच दरम्यान, नागरिकांनी त्यांना रस्त्याबाबत प्रश्न विचारले त्यामुळे मंत्री कमल पटेल नाराज झाल्याचे पाहायला मिळाले
मंत्री कमल पटेल यांच्यासमोर एका मतदाराने इथे कोणती कामे झाली नाहीत याबाबत तक्रार केली. यानंतर नाराज झालेल्या पटेलांनी काँग्रेसला मतदान करण्याचा सल्ला दिला.
यानंतर त्या मतदाराने मी काँग्रेसला मतदान करणार नाही असे सांगितले. तसेच माझ्या तीन पिढ्या भाजपला मतदान करत असून बोलून काही होत नाही त्यासाठी काम करावे लागते असे मतदाराने मंत्रीमहोदयांना सुनावले
भाजपने हरदा मतदारसंघातून कमल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. २०१८च्या निवडणुकीतही कमल पटेल यांनी हरदामधून निवडणूक जिंकली होती.
यावेळी हरदा विधानसभा जागेवर भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर आहे. मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदानानंतर ३ डिसेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.